Home शिरूरमहाराष्ट्र हिप्परगा (रवा) येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने संपूर्ण गावात दारूबंदीचा एकमुखी ठराव केला मंजूर

हिप्परगा (रवा) येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने संपूर्ण गावात दारूबंदीचा एकमुखी ठराव केला मंजूर

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

लोहारा | प्रतिनिधी लोहारा
तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील ग्रामस्थांनी गावातील वाढत्या व्यसनाधीनतेला पायबंद घालण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. गावातील शांतता, सुव्यवस्था आणि तरुण पिढीचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी यात्रेच्या निमित्ताने एकत्र येऊन गावात संपूर्ण दारूबंदी करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे.

प्रशासनाला प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते निवेदन देण्यात आले आहे
केवळ ठराव करून न थांबता, हिप्परगा (रवा) येथील ग्रामस्थांनी संघटित होऊन प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. आज ग्रामस्थांच्या एका मोठ्या शिष्टमंडळाने खालील कार्यालयांना भेटी देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले होते तेव्हा प्रथमता लोहरा पोलीस ठाणे
तहसील कार्यालय, लोहारा
जिल्हाधिकारी कार्यालय (कलेक्टर ऑफिस)
पोलीस अधीक्षक कार्यालय (एस.पी. ऑफिस) अशा अनेक सरकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आले तेव्हा निवेदनामध्ये ग्रामस्थांनी प्रमुख मागण्या स्पष्ट केल्या आहेत, गावातील अवैध दारू विक्रीमुळे कौटुंबिक कलह वाढले असून तरुणांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे गावात होणारी अवैध दारू विक्री तातडीने बंद करण्यात यावी

दारू विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

भविष्यात गावात कोणत्याही प्रकारचे मद्यविक्रीचे दुकान किंवा परवाना दिला जाऊ नये.

banner

“गावाच्या विकासासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी दारूबंदी होणे काळाची गरज होती. संपूर्ण गावाने एकत्र येऊन घेतलेला हा निर्णय हिप्परगा (रवा) गावाच्या परिवर्तनाची नांदी ठरेल,” अशी भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण मंडळी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. आता प्रशासन यावर काय आणि किती लवकर कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्व कार्यालयत निवेदन देण्यासाठी हिप्परगा रवा गावचे पोलीस पाटील संजय नरगाळे विद्यमान उपसरपंच सुनील जाधव विद्यामान ग्रामपंचायत सदस्य विजय लोमटे
विद्यामान ग्रामपंचायत सदस्य विनोद मोरे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रावण कांबळे, व गावातील तरुण सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव, महेश जाधव बालाजी मुळे दत्तात्रय मुळे सतीश भोसले, सतीश भोसले,
नरसिंग पांगू जाधव’ हे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन. पिंपरी चिंचवड (दिनांक १४ एप्रिल २०२६) डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अफाट सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सक्षमीकरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, सन्मानास पात्र आहे. समानता, न्याय आणि सर्वांप्रति आदर यावर आधारित समाजाचे त्यांचे ध्येय आपण पुढे नेऊया. असे निरूपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले, आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढून शिक्षण, संघटना आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि शोषितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देत राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा. नगरसेवक पंडीत गवळी,ॲड गोरक्ष लोखंडे, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, नगरसेविका वर्षा जगताप, योगिता बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, संभाजी बारणे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, सरचिटणीस नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?