तळवडे प्रतिनिधी (दिनांक १३ एप्रिल २०२६) तलावडे येथील दिनांक ३ एप्रिल पासून पासून ते ११ एप्रिल पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह. संपन्न झाला अनेक नामांकित प्रवचनकार कीर्तनकार महाराजांच्या हस्ते गाथा पारायण कीर्तन प्रवचन सोहळा असे विविध कार्यक्रमाचे सालाबाद प्रमाणे आयोजन केले होते.विविध कार्यक्रम संपन्न होत असताना शेवटी काल्याचे किर्तन झाले.भैरवनाथ महाराज उत्सव कार्यक्रम संपन्न होत असताना ११ तारखेला बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यावेळी अनेक परिसरातून बैलगाडा शौकीन यांनी सहभाग घेतला होता.
श्री भैरवनाथ महाराजांच्या भव्य बैलगाडा शर्यती एकूण इनाम ६१३००० सतत तीन वर्षासाठी एक ट्रॅक्टर एक लाख रुपये एकूण १७६ बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेतला होता.
प्रथम क्रमांक १२ सेकंदात ४६ गाडे रुद्र दादा गणेश येळवंडे निघोजे खेड
द्वितीय क्रमांक १३ सेकंद ४८ अर्णवर रमेश ताम्हाणे चिखली हवेली
तृतीय क्रमांक १४ सेकंदात २५ गाडे रुद्रांश प्रशांत आल्हाट मोशी तालुका हवेली
आकर्षक फायदा साठी २५ गाडे सहभागी झाले होते.फायनल क्रमांका साठी स्वर्गीय दयानंद भाऊ येळवंडे प्रतिष्ठान,नरहरी सदाशिव बालगरे,सचिन शेठ मधुकर सोनवणे,विक्रम दिलीप बोत्रे, शिविलराजे स्वप्निल गवारे,या सर्व बैलगाडा शौकीन यांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली होती त्यावेळी तळवडे गावचे ग्रामस्थ यात्रे नियोजन कमीटी देणगीदार बंधू आजी माजी नगरसेवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
