Home शिरूरमहाराष्ट्र *जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्षांची लागवड*

*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्षांची लागवड*

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पुणे प्रतिनिधी ( दिनांक५ जुन २०२६) जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कारागृह विभाग आणि रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्षांची लागवड करून घनदाट नागरी वन (डेन्स अर्बन फॉरेस्ट) निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमास आज प्रारंभ करण्यात आला.

या वेळी उपक्रमासाठी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक तथा कारागृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. सुहास वारके (आयपीएस), म्युनिशन्स इंडिया लिमिटेडच्या मानव संसाधन विभागाचे संचालक नंदकिशोर नाईक, रोटरी प्रांत ३१३१ चे प्रांतपाल संतोष मराठे, रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोडचे अध्यक्ष रोटेरियन देवदत्त हंबर्डीकर आणि सभासद, येरवडा कारागृह प्रशासनाचे अधिकारी शामकांत शेडगे, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१चे संचालक पर्यावरण राजेंद्रकुमार सराफ आदी उपस्थित होते.

वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड यांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. येरवडा खुल्या कारागृहाच्या परिसरातील एक एकर जागेवर हा घनदाट नागरी वन निर्माण करण्याचा प्रकल्प राबविण्यात येत असून, या माध्यमातून पर्यावरण संवर्धना बरोबरच शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

घनदाट जंगले म्हणजे अशी ठिकाणे, जिथे झाडे एकमेकांच्या इतकी जवळ असतात की जमिनी पर्यंत सूर्य प्रकाश पोहोचणे कठीण होते. ही जंगले पृथ्वीची फुफ्फुसे मानली जातात आणि येथे अनेक दुर्मिळ वनस्पती व वन्यजीव राहतात.

banner

शहरी घनदाट जंगले ही शहराची फुफ्फुसे आहेत. घनदाट नागरी वनामुळे जैवविविधतेचे संवर्धन, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा, कार्बन शोषण क्षमता वाढ आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यास मोठी मदत होणार आहे. केवळ वृक्षलागवड करून थांबणे हा या उपक्रमाचा उद्देश नसून, लागवड केलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनाने स्वीकारली आहे. हा परिसर समृद्ध हरित पट्टा म्हणून विकसित होईल. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?