Home शिरूरमहाराष्ट्र आळंदी मध्ये नियमाचे पालन नाही बेशिस्तपणे गाड्या थेट माऊलींच्या मंदिरासमोर 

आळंदी मध्ये नियमाचे पालन नाही बेशिस्तपणे गाड्या थेट माऊलींच्या मंदिरासमोर 

भाविक व मंदिर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

आळंदी प्रतिनिधी (दिनांक १२ नोव्हेंबर २०२६) आळंदी आळंदीतील भराव रस्त्यावर लोखंडी गेट, आळंदी देवस्थानचे सुरक्षा कर्मचारी असताना थेट सर्व प्रकारच्या गाड्या माऊली मंदिरासमोर थेट येतात. यामुळे भाविक आणि मंदिर व परिसर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भराव रस्त्यावर एकही गती रोधक नसल्याने वाहने सुसाट मंदिराकडे येतात. भराव रस्त्यावर नो पार्किंग बोर्ड नावापुरता असून ५० मीटर दोन्ही बाजूने वाहन पार्क करण्यास मनाई असताना बेशिस्त पार्किंग वाढली असल्याने भाविक, नागरिकांना ये जा करण्यास गैरसोयीचे होत आहे. यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केलं

आळंदी नगरपरिषदेने अनेक ठिकाणी गतिरोधक बसविले. मात्र मंदिर परिसरातील वर्दळीचा मुख्य भराव रस्त्यावर गतिरोधक विकसित करण्यास विसर पडला आहे. तत्काळ भराव रस्त्यावर चार ठिकाणी अनाधिकृतपणे. गतिरोधक बसविण्याची मागणी आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केली आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles