Home शिरूरमहाराष्ट्र सागर सूर्यवंशी यांचे फ्लॅक्स काढणाऱ्यांना कसली भीती

सागर सूर्यवंशी यांचे फ्लॅक्स काढणाऱ्यांना कसली भीती

प्रभाग क्रमांक ९ मध्ये निवडणूक तारखा जाहीर होण्या आधीच नागरिकांनी लावलेले सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स प्रशासनाने काढले की विरोधकांनी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

! प्रतिनिधी | पिंपरी चिंचवड, दिनांक (११ नोव्हेंबर २०२५) नेहरूनगर खराळवाडी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये भारतीय जनता पार्टीकडून प्रभावशाली इच्छुक उमेदवार सागर गोपाळ सुर्यवंशी यांना प्रभागातून विविध संस्था संघटना, मित्र परिवार, मित्र मंडळे आणि सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील स्थानिक मित्र आणि कार्यकर्त्यांकडून पत्रकार सागर सूर्यवंशी यांच्या नावाची शिफारस प्रभावीपणे उमेदवार म्हणून केली जात असून परिणामी विरोधकांमध्ये धाकधुक वाढत चालली असून प्रभागातील सागर सूर्यवंशी यांना पाठिंबा असल्याचे फ्लेक्झ बॅनर विरोधकांनी प्रशासनाला हाताशी धरून काढण्याचे कृत्य केल्याची चर्चा प्रभागामध्ये सुरू आहे.

 

भाजपचे प्रभावशाली दावेदार उमेदवार म्हणून स्थानिक नागरिकांनी पत्रकार सागर सूर्यवंशी यांचे नाव पुढे केल्यामुळे आणि नागरिकांनीच स्वयंस्पूर्तीने सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स लावल्यामुळे विरोधकांमध्ये धाक धुक वाढली असल्याने असे कृत्य प्रशासनाला तक्रारी करून केले असल्याचा दावा खराळवाडी येथील अनेक मित्र मंडळे करीत आहेत. आत्तापासूनच सागर सूर्यवंशी यांना जनतेचे वाढता पाठिंबा मिळत असल्याचा हा परिणाम असून लावलेले फ्लेक्स काढल्याने सागर सूर्यवंशी यांचा प्रभाव कमी होणार नाही असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. सागर सूर्यवंशी यांचे हिंदुत्वाचे कार्य आणि भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या विंग चे कार्य पाहता प्रभाग क्रमांक ९ मधून सागर सूर्यवंशी हेच योग्य उमेदवार असल्याची चर्चा सध्या प्रभागात सुरू आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?