फलटण / सातारा प्रतिनिधी (दिनांक ११ जुलै २०२६)
डायमंड टॅलेंट सर्च परीक्षा २०२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय इस्रो (ISRO) अवकाश प्रदर्शन भेट परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल, कोळकी (फलटण) येथील विद्यार्थिनी कुमारी आरोही आनंद नरगाळे हिने इंग्रजी माध्यमातून १०० पैकी ८३ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
व तिची बेंगलोर येथे इसरो प्रदर्शन व्हिजिट साठी निवड झाली आहे
तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आरोहीचे मूळ गाव धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) आहे. तिचे वडील रोजगारानिमित्त फलटण येथे नोकरी करत असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर तिने हे यश मिळवले आहे.
“आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी भविष्यात शास्त्रज्ञ बनणार,” असा निर्धार व्यक्त करत आरोहीने आपल्या यशामागील प्रेरणा सांगितली. तिच्या या यशामुळे परिसरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आरोहीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे पालक, शिक्षक, नातेवाईक तसेच हिप्परगा (रवा) गावातील ग्रामस्थांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
