Home शिरूरमहाराष्ट्र थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

पिंपरी, (दिनांक २ जून २०२६) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक २४, मौजे थेरगाव येथील लेमनट्री हॉटेल ते मोरया बॅन्क्वेट हॉल दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण प्रकल्पाअंतर्गत अनधिकृत बांधकामांवर आज निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण ३० ठिकाणांवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. या कारवाईमध्ये सुमारे १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रफळावरील अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. ही कारवाई महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप यांच्या अधिपत्याखाली पार पडली.

या कारवाईमध्ये उपअभियंता सुनील बेळगावकर व जयवंत रोकडे यांच्यासह महापालिकेच्या धडक कारवाई पथकातील ‘ब’, ‘ड’ व ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांचे १४ बीट निरीक्षक सहभागी होते. तसेच ४० एमएसएफ जवान, १ पोलीस उपनिरीक्षक, ९ पोलीस कर्मचारी, १० कंत्राटी मजूर, ७ मजूर कर्मचारी आणि ५ जेसीबी यंत्रांच्या सहाय्याने ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. या कारवाईस शहरी दळणवळण विभाग, विद्युत विभाग, नगररचना विभाग तसेच इतर संबंधित विभागांचे सहकार्य लाभले.

banner

कोट
शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, सुकर आणि गतिमान करण्यासाठी रस्ता रुंदीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे या कामांमध्ये अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे नियमानुसार हटविण्यात येत आहेत. नागरिकांच्या व्यापक हितासाठी आणि शहराच्या नियोजित विकासासाठी अशा कारवाया आवश्यक असून, सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे. पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?