Home शिरूरमहाराष्ट्र च-होली तलाठी ACB जाळ्यात खाजगी एजंटला ही रंग हात पकडले ७० हजार वारस नोंद करण्यासाठी केली होती मागणी

च-होली तलाठी ACB जाळ्यात खाजगी एजंटला ही रंग हात पकडले ७० हजार वारस नोंद करण्यासाठी केली होती मागणी

अँन्टी करप्शन ब्युरो, पुणे कडून च-होली येथील तलाठी व एका खाजगी इसमावर गुन्हा दाखल

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

च-होली प्रतिनिधी (दिनांक ९ जून २०२६) श्री सुनील भिकाजी सातोसे, वय ४४ वर्ष, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), चहोली बटुक, तालुका हवेली, जिल्हा पुणे राठी. ए ,१३०७, आय ट्रेंड लाइफ, वाकड, पुणे, मूळगाव- मुपो केंबळी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर. (बर्ग ३)

च-होली बुद्रुक ग्राम महसूल कार्यालय, तालुका हवेली, जिल्हा पुणे ग्राम महसूल कार्यालय, तालुका हवेली, जिल्हा पुणे

श्री नेगाजी माधवराव भोकरे, वय ४० वर्षे, खाजगी इसग, रा ठि-चहोली खुर्द रोड, काकडे सिटी, तालुका हवेली, जिल्हा पुणे (खाजगी इसम)सुरवातीची लाच मागणी रु. १,८०,०९०/ रुपयाच्या लाचेची मागणी करून तडजोड करून रू. ८०,०००/ (ऐंशी हजार रूपये) लाच मागणी केली होती

पडताळणी दरम्यान लाच मागणी रु. ८०,०००/-रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती रू. ७०,०००/- (सत्तर हजार रुपये) लाच मागणी केली.पडताळणी दिनांक ४/६/२०२६ रोजी स्वीकारलेली रक्कम ७०,००० (सत्तर हजार रूपये) सापळा दिनांक ठिकाण ०८/०६/२०२६ सापळा अधिकारी यांचे नाव व पद श्रीमती शैलजा शिंदे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, पुणेतपास  अधिकारी यांचे नाव व पद श्रीमती निता मिसाळ, सहा. पोलीस आयुक्त, लाप्रवि, पुणे

banner

तक्रारदार यांचे आजोबांची चहोली बद्रुक येथे वडिलोपार्जित जमीन आहे. त्यांच्या आजोबांचे निधन झाल्यानंतर सदर शेतजमिनीवर तक्रारदार यांचे वडील व तक्रारदारांचे काका यांची वाररानोंद लावण्यासाठी तक्रारदार यांनी डिसेंबर २०२५ मध्ये चहोली बटुक ग्राम महसूल कार्यालय येथील अधिकारी आलोसे क्र. १ श्री. सुनील सातोसे यांना अर्ज दिला होता. त्याबाबत तक्रारदारांनी वारंवार चौकशी करून देखील आलोसे क्र. १ श्री. सुनील सातोसे यांनी तक्रारदार यांचे वडील व काका यांची जमिनीच्या सातबार्यावर वारसनोंद केली नाही.

दिनांक २९/५/२०२६ रोजी तक्रारदार हे वारस नोंदणी बाबत परत एकदा चौकशी करण्याकरिता चन्होली बटुक ग्राम महसूल कार्यालय येथे गेले असता आलोसे क्रमांक १ सुनील सातोसे यांनी तक्रारदार यांना वारस नोंदीसाठी १८९,०००/- रुपयाच्या लाचेची मागणी करून तडजोड करून ८०,०००/- रुपये लाच मागणी केली याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी दिनांक ०१/०६/२०२६ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती.

 

तक्रारदाराच्या प्राप्त तक्रारीच्या अनुशंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक०४/०६/२०२६ रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी कारवाईदरम्यान आलोरो श्री रानील सातोसे यांनी तक्रारदारांकडून त्यांचे वरील काम करून देण्यासाठी ८९,०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ७०,०००/- रुपये लाच मागणी करून ती आरोपी क्रमांक २ खाजगी इसम नेमाजी भोकरे यांचेकडे देण्यास सांगितले.

 

वरील प्रमाणे झालेल्या लाच मागणीच्या अनुषंगाने आज दिनांक ०८/०६/२०२६ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाईदरम्यान आरोपी लोकसेवक क्रमांक १ श्री सुनील सातोसे यांचे सांगण्यावरून आरोपी खाजगी इसम नेमाजी भोकरे यांनी तक्रारदाराकडून त्याच्या वरील कामासाठी ७०,०००/- रुपये लाच स्वीकारली असता१५.१२ वा. आलोसे क्र.१ श्री सुनील सातोसे व आरोपी खाजगी इसम क्रमांक २ श्री नेमाजी गोकरे यांना चहोली बुद्रुक ग्राम महसूल कार्यालय, तालुका-हवेली, जिल्हा-पुणे येथे रंगेहात पकडण्यात आले.

दोन्ही आरोपीस ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध दिघी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड येथे गुन्हा दाखल झाला आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?