Home शिरूरमहाराष्ट्र मारूजी येथे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मारूजी येथे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जयंती मोठ्या उत्साहात साजरी

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड मारुजी प्रतिनिधी दिनांक (१५ ऑक्टोंबर २०२५) जिल्हा परिषद शाळा -मारुऺजी येथे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याप्रसंगी वाचन प्रेरणा दिन व भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी अनेक चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विचाराची या देशाला काळाची गरज आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी भाषणे केली.

तसेच या विद्यालयामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी मोठ्या कष्टाने परिश्रम घेतले होते त्यावेळी श्रीम.अरु॑धती फल्ले मॅडम यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या विषयी माहिती सांगताना मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकारचे हास्य निर्माण झालेले दिसून आले त्यावेळी .मा.मुख्याध्यापक श्रीम. ललिता वाघमारे मॅडम यांनी वाचनाचे महत्व काय असते त्या विषयावरती अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीना खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता अशा पद्धतीने या कार्यक्रमासाठी अनेक शिक्षकांनी यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?