Home शिरूरमहाराष्ट्र गांधीनगर-खराळवाडीत ‘स्थानिक’ विकासाचा १८ वर्षानंतर नवा सूर्य उगवणार

गांधीनगर-खराळवाडीत ‘स्थानिक’ विकासाचा १८ वर्षानंतर नवा सूर्य उगवणार

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड दिनांक : १९ नोव्हेंबर २०२५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमसृष्टी, पिंपरी चौक, पिंपरी-चिंचवड प्रभाग क्र. ९ गांधीनगर-खराळवाडी मध्ये ‘बाहेरचा’ उमेदवाराला मान्यता नाही फक्त ‘स्थानिक’ उमेदवारालाच सर्वपक्षीय इच्छुकांचे अभेद्य पाठबळ आणि विजयी करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त करण्यात आला

 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ गांधीनगर-खराळवाडी परिसरातील नागरिकांमध्ये आज अभूतपूर्व एकजूट दिसून आली. सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते, संघटनांचे पदाधिकारी आणि परिसरातील संतप्त नागरिकांची तातडीची बैठक आज भीमसृष्टी, पिंपरी चौक येथे ऐतिहासिक संख्येने पार पडली.

गेल्या जवळपास दोन दशकांपासून १८ वर्षे गांधीनगर आणि खराळवाडी परिसर स्थानिक लोकप्रतिनिधी पासून वंचित राहिला आहे. ‘बाहेरच्या’ नगरसेवकांमुळे हा प्रभाग फक्त मतदानाचे केंद्र बनला आणि विकासापासून कोसभर दूर फेकला गेला आता ही उपेक्षा सहन केली जाणार नाही, असा रणशिंग उपस्थितांनी फुंकले आहेत आमच्या ज्वलंत समस्या फक्त ‘स्थानिक’ प्रतिनिधी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे या संदर्भात स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत खालील समस्यांचा पाढा वाचला, ज्या सोडवण्यात बिगर-स्थानिक उमेदवार पूर्णपणे अपयशी ठरले:

banner

समस्येचे स्वरूप पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई महिलांचा दररोजचा संघर्ष. सार्वजनिक शौचालयांची लाजिरवाणी कमतरता विशेषतः महिलांसाठी आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न अंतर्गत रस्त्यांची पूर्णपणे दुरवस्था अपघातांचे प्रमाण वाढले.दिवाबत्ती व्यवस्थेतील कायमचा खंड रात्रीच्या वेळी गुन्हेगारीला आमंत्रण बेरोजगारी आणि तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता भावी पिढी धोक्यात. गुन्हेगारीमध्ये झालेली स्फोटक वाढ शांतता व सुरक्षितता धोक्यात. सरकारी योजनांचा गैरफायदा गरजूंना लाभ नाही, फक्त मध्यस्थांची लूट आणि मनमानी. विधवा, निराधार योजनांचा लाभ स्थानिकांपर्यंत पोहोचत नाही. बैठकीतील ऐतिहासिक आणि निर्णायक ठराव (सर्वानुमते)

या समस्यांवरून हे स्पष्ट होते की, स्थानिक उमेदवारच या मातीतील वेदना ओळखतो आणि तोच त्वरित न्याय देऊ शकतो!

> “सर्व राजकीय पक्षांना सूचना करण्यात आल्या आहेत की प्रभाग क्र. ९ अनुसूचित जाती राखीव जागेसाठी मधून फक्त आणि फक्त ‘स्थानिक भूमिपुत्रालाच’ उमेदवारी द्यावी कोणत्याही पक्षाने ‘बाहेरील’ परप्रांतीय/बिगर-स्थानिक उमेदवार उभा करण्याचा दुस्साहस केला, तर गांधीनगर-खराळवाडी परिसरातील मतदार त्या उमेदवाराला ‘एकही’ मत देणार नाहीत. असा ठराव मंजूर करण्यात आला ..

हा अंतिम आणि अपरिवर्तनीय ठराव सर्वपक्षीय इच्छुक, महिला बचत गट, युवक मंडळे, सामाजिक संघटना व प्रभागातील प्रत्येक नागरिकाने शपथपूर्वक व दृढपणे संमत केला आहे

जय भीम जय महाराष्ट्र आता फक्त स्थानिक बाहेरचा नाही गांधीनगर-खराळवाडीत ‘स्थानिक’ विकासाचा नवा सूर्य उगवणार!

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?