Home शिरूरमहाराष्ट्र लोकसहभाग हीच शहर विकासाची ताकद” – महापौर रवि लांडगे

लोकसहभाग हीच शहर विकासाची ताकद” – महापौर रवि लांडगे

निगडी येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ऑक्सीजन पार्क चे उद्घाटन पर्यावरणाचे रक्षण करण्याची घेतली शपथ

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी, (दिनांक ३ एप्रिल २०२६)
“लोकसहभागातून उभे राहणारे उपक्रम हीच शहर विकासाची खरी ताकद आहे, निगडी परिसरातील नागरिक आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार झालेला ऑक्सिजन पार्क हा एक अनोखा आदर्श असा पर्यावरणपूरक उपक्रम आहे असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी निगडी प्राधिकरण येथील ऑक्सिजन पार्कच्या उद्घाटन प्रसंगी केले.

निगडी प्राधिकरण येथील सेक्टर २६ मध्ये स्थानिक रहिवासी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या सहभागातून विकसित करण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले,त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास आमदार अमित गोरखे,उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शमहापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी,नगरसदस्या शैलजा मोरे,अनुराधा गोरखे, नगरसदस्य अमित गावडे यांच्यासह महापालिका मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे,कार्यकारी अभियंता सुनील पवार, दिलीप भोसले, जयकुमार गुजर,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तसेच राजेंद्र बाबर, विजय नाईक,धनंजय शेडबाळे,सुर्यकांत मुथियान व ऑक्सिजन पार्क उभारण्यात सक्रिय सहभाग नोंदविणारे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले की,पर्यावरण संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असून अशा हरित प्रकल्पांमुळे पिंपरी चिंचवड शहर हे अधिक आरोग्यदायी आणि सुंदर बनेल. तसेच शहरातील २०३ उद्यानांपैकी २५ ते ३० उद्यानांमध्ये अशी संकल्पना लोकसहभागातून राबविण्यात येईल,असेही त्यांनी बोलताना सांगितले.

banner

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच ‘माझी वसुंधरा’ शपथ घेऊन पर्यावरण संवर्धनाचा निर्धार व्यक्त करण्यात आले.

*माझी वसुंधरा शपथ*

“आम्ही भारताचे सुजाण नागरिक म्हणून शपथ घेतो की,आम्ही भारतमातेला आणि या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करू, या वसुंधरेला आणि पर्यावरणाला आमच्याकडून कोणतीही हानी होणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ. आम्ही या देशाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी कटिबद्ध राहू आणि आमच्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम आम्ही करणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला आणि वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करू, अशी शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली. शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

शहरातील प्रत्येक प्रभागात हरित क्षेत्र वाढावे, यासाठी प्रशासन आणि नागरिक एकत्र येत आहेत. लोकसहभागातून साकारलेले ऑक्सिजन पार्क हे भावी पिढ्यांसाठी मौल्यवान ठेवा आहे.
— शर्मिला बाबर, उपमहापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर हरित क्षेत्रांचे जतन व संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांच्या सहभागातून साकारलेला हा प्रकल्प पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल आणि हरित शहराच्या संकल्पनेला बळ देईल.
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन. पिंपरी चिंचवड (दिनांक १४ एप्रिल २०२६) डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अफाट सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सक्षमीकरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, सन्मानास पात्र आहे. समानता, न्याय आणि सर्वांप्रति आदर यावर आधारित समाजाचे त्यांचे ध्येय आपण पुढे नेऊया. असे निरूपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले, आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढून शिक्षण, संघटना आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि शोषितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देत राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा. नगरसेवक पंडीत गवळी,ॲड गोरक्ष लोखंडे, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, नगरसेविका वर्षा जगताप, योगिता बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, संभाजी बारणे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, सरचिटणीस नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?