Home शिरूरमहाराष्ट्र पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन…

पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन…

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड (दिनांक ३ एप्रिल २०२६) रोजी सकाळी ११:०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, मा.महापौर श्री.योगेश बहल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की,आजच्या दिवशी आपण केवळ महाराजांना अभिवादन न करता, त्यांच्याकडून मिळालेल्या नैतिकतेच्या आणि पराक्रमाच्या शिकवणीचा अवलंब करूया. शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालून, समृद्ध आणि समर्थ महाराष्ट्र घडवणे आणि भ्रष्टाचारमुक्त समाज, महिलांचा आदर आणि राष्ट्राप्रती निष्ठा हीच महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल. शिवराय नसले तरी त्यांची प्रेरणा अमर आहे,शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते, तर ते एक ‘विचार’ होते,त्यांचे धैर्य, बुद्धिमत्ता आणि प्रजाभक्ती आपल्याला नेहमी मार्गदर्शन करेल. आज या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा करूया आणि त्यांच्या स्वप्नातील समृद्ध, एकसंध आणि स्वाभिमानी भारत घडवण्यासाठी कटिबद्ध होऊया.

यावेळी ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले की, महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून अत्यंत शिस्तबद्ध राज्यकारभार चालवला. ‘शत्रू कितीही बलाढ्य असला तरी आपल्या हेतू आणि उत्साहानेच त्याचा पराभव होऊ शकतो’ हा आत्मविश्वास त्यांनी मराठी माणसाला दिला. तसेच स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांची काळजी आणि सर्वधर्मसमभाव, ही त्यांच्या स्वराज्याची प्रमुख वैशिष्ट्ये होती. या युगपुरुषाला, रयतेच्या राजाला, छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथी निमित्त माझे कोटी कोटी प्रणाम..!

यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल,कार्याध्यक्ष फजल शेख,शाम लांडे, विजय लोखंडे,मा.नगरसेवक ॲड गोरक्ष लोखंडे, राजेंद्र जगताप, मायला खत्री, बन्सी पारडे,नगरसेवक जितेंद्र ननावरे, नगरसेविका प्रतिक्षा लांघी-जवळकर,उद्योग व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार,अभिजीत आल्हाट, अकबर मुल्ला, गोरोबा गुजर,महीला सरचिटणीस निलम कदम, शहर सरचिटणीस गणेश गायकवाड,प्रदेश सरचिटणीस ज्ञानेशवर कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन,सुरविंद्रसिंग बाला, सचिन गायकवाड,अभिजीत आपटे, धनाजी तांबे,सुनिल अडागळे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

banner

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन. पिंपरी चिंचवड (दिनांक १४ एप्रिल २०२६) डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अफाट सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सक्षमीकरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, सन्मानास पात्र आहे. समानता, न्याय आणि सर्वांप्रति आदर यावर आधारित समाजाचे त्यांचे ध्येय आपण पुढे नेऊया. असे निरूपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले, आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढून शिक्षण, संघटना आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि शोषितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देत राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा. नगरसेवक पंडीत गवळी,ॲड गोरक्ष लोखंडे, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, नगरसेविका वर्षा जगताप, योगिता बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, संभाजी बारणे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, सरचिटणीस नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?