Home शिरूरमहाराष्ट्र २८ राज्ये व ३ देश सहभागी;पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रीय सांस्कृतिक महासंगम

२८ राज्ये व ३ देश सहभागी;पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रीय सांस्कृतिक महासंगम

महाराष्ट्र युवा संघटन व रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे राष्ट्रीय सांस्कृतिक युवा आदान-प्रदान महोत्सव

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) दि.३ सप्टेंबर २०२५:– भारताच्या सांस्कृतिक वैविध्याचा भव्य संगम पिंपरी चिंचवडमध्ये रंगणार आहे. महाराष्ट्र युवा संघटन व रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरा राष्ट्रीय सांस्कृतिक युवा आदान-प्रदान महोत्सव १५ ते १७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला असून, यामध्ये देशातील २८ राज्यांसह ३ परदेशातील युवा प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती (दि.२) पत्रकार परिषदेत समीर भंडारकर यांनी दिली.

यावेळी भंडारकर म्हणाले की,महाराष्ट्र युवा संघटन गेली १५ वर्षापासून युवकांसाठी संस्कृती संवर्धन व भारतीय मक्तेदारीसाठी कार्य करीत असून देशाची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे मध्ये राष्ट्रीय एकोपा जपून सांस्कृतिक आदान प्रदान करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील पिंपरी चिंचवड (आकुर्डी) येथील ग.दी. माडगुळकर सभागृह येथे महासंगम होणार आहे.यामध्ये २८ राज्य व ३ देशातील युवक व युवती आपआपल्या राज्यातील संस्कृतीचे दर्शन १५ ते १७सप्टेंबर २०२५ या काळात दाखविणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात १५ सप्टेंबर २०२५ रोजी पिंपरी चिंचवड येथील आकुर्डी परिसरात सकाळी ११ वाजता कार्यक्रमाची सुरुवात सद्भावना रॅली पारंपारिक वेशभुषेत युवक व युवतींची रॅली काढण्यात येणार आहे.

आकुर्डी जवळ २८ राज्यातील मृदा (माती) व जल येताना घेवून येणार आहेत, त्यांचे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून मक्तेदारीचे वृक्ष लावण्यात येणार आहे व तीनही दिवस २८ राज्य व ३ देशाचे सांस्कृतिक महोत्सव सायंकाळी ५ ते ८ वा. या वेळेत पार पाडण्यात येणार आहे.तसेच दिनांक १५ सप्टेंबर रोजी राज्यभरातून आलेल्या युवांचा सन्मान करण्यात येणार असून दिनांक १६ सप्टेंबर रोजी भारतभरातून आलेल्या युवक व युवतींकरीता पिंपरी चिंचवड परिसारतील प्रेक्षणिय, एतिहासिक स्थळांचे दर्शन घडवून आणण्यात येणार आहे. व दिनांक १७सप्टेंबर रोजी तासगावकर फौंडेशन यांचे मार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे व शेवटी निरोप समारंभाने कार्यक्रमाची सांगता होईल अशी माहिती संतोष गिरंजे यांनी यावेळी दिली.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे उद्घाटक म्हणून पिंपरी चिंचवडचे आयुक्त माननीय शेखर सिंग, पंकज पाटील उपआयुक्त, हे उपस्थित राहणार आहेत.तसेच यावेळी नाटय परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी महापौर शैलजा अविनाश मोरे, प्रदेशाध्यक्ष भाजपा युवा मोर्चाचे अनुपदादा अविनाश मोरे, युवा उद्योजक पूनीतजी बालन, जान्हवीताई बालन (धारीवाल), संतोष मराठे जिल्हा प्रांतपाल, रो. आनंद संपत अध्यक्ष, रोहन रोकडे सचिव, समीर भंडारकर, संतोष गिरंजे, पवन गुप्ता भावी प्रांतपाल, नितीन ढमाले, रो. वंश चावला, शुभम राऊत, स्वस्ती राय, मा. सुजाता सातव मॅडम, दत्ता दळवी, मल्लिकार्जुन बंकाकुळे, विजय संतान, युवराज नाईक, महादेव कांचन, एस.एस. तिवारी, डॉ.प्रा. अन्वर शेख, डॉ. प्रा. सुधाकर जाधव, सागर घोरपडे (पोलीस), अविनाश सकुंडे (लंडन बुक ऑफ संचालक), लहु कांबळे (संस्थापक अध्यक्ष), पल्लवी गोपाळे सरपंच, संग्रामदादा कोंडे, संजय जगताप, अविनाश शेटे माय भारत संचालक, भारत सरकार इत्यादी मान्यवर कार्यक्रमाच्या तीनही दिवसांकरीता उपस्थित राहणार आहेत.

banner

सदर कार्यक्रमाकरीता विशेष सहकार्य रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांचे लाभले आहे. समन्वयक म्हणून मोतीलाल बेंद्रे विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद पुणे, हनुमंत देसाई, संतोषी शेट्टी, दिनेश भंडारे, साहिल गायकवाड, कुणाल इटकर, प्रेम चाबुकस्वार, अभिजित रोकडे, इत्यादी युवक सदर कार्यक्रम पार पाडणार आहेत.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?