Home शिरूरमहाराष्ट्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी, दि. २४ नोव्हेंबर २०२५ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस शहर अभियंता मकरंद निकम यांच्या हस्ते तर निगडी येथील लोकमान्य टिळक चौकातील त्यांच्या पुतळ्यास सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कार्यक्रमास माजी नगरसदस्या सुमन पवळे,सह शहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह मधूकर पवळे यांच्या नातेवाईक अनिता लांडे, सुनिता चोरघे, रेणुका उत्तेकर, ज्योती गवारे, राजलक्ष्मी चोरघे, ओंकार पवळे, विनीत गवारे, सिद्धिराम शिरसाईल आदी उपस्थित होते.

तर निगडी येथील कार्यक्रमास माजी नगरसदस्य अजित गव्हाणे, माजी नगरसदस्या सुमन पवळे, प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढवळे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडे, पंकज बगाडे, राजाराम राऊत, भिकाजी केंजळे, लहू धुमाळ, सचिन रोमन, तुकाराम राऊत, राजाराम लोंढे, विनीत गवारे, विनायक चोरघे यांच्यासह पवळे कुटुंबीय व नागरिक उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?