30
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा बॉल बॅडमिंटन स्पर्धा ही अमृता विद्यालय यमुनानगर निगडी येथील शाळेच्या मैदानावर संपन्न होत आहेत. आज झालेल्या उद्घाटनाच्या वेळी प्राचार्य स्वामिनी पवना अमृता चैतन्य तसेच उपमुख्याध्यापिका अमृता चैतन्य तसेच क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे सर तसेच क्रीडा शिक्षक शेखर कुलकर्णी प्रास्ताविक केले . स्पर्धेचे कामकाज हनुमंत सुतार, शिवाजी मुटकुळे,अजित मुंडे, यांनी केले.पंच म्हणून प्रसाद हरपळे सर व नितेश गुप्ता सर यांनी जबाबदारी पार पाडली तर हनुमंत सुतार यांनी सूत्रसंचालन केले