Home शिरूरमहाराष्ट्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर बिलांचे बचत गटांच्या महिलांकडून वाटप सुरू*

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर बिलांचे बचत गटांच्या महिलांकडून वाटप सुरू*

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

*पिंपरी , २० एप्रिल २०२५ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने २०२५-२६ या आर्थिक वर्षातही महिला बचत गटाच्या मार्फत बिलांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. तरी बिल वाटप करण्यासाठी येणाऱ्या महिलांना सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

 

पिंपरी-चिंचवड शहरात ६ लाख १५ हजार ८६३ नोंदणीकृत मालमत्ता आहेत. त्यानुसार सर्वच बिलांची छपाई होऊन बिले वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. महिला बचत गटातील महिलांच्या माध्यमातून मिळकतकर बिले घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी महानगरपालिकेने महिला आर्थिक विकास महामंडळावर सोपवली आहे. बिल वाटप करण्यात येणाऱ्या महिलांना महानगरपालिकेच्या वतीने ओळखपत्र ही देण्यात आले आहे. ३१ मे पर्यंत सर्व बिलांचे वितरण करण्याचे नियोजन महानगरपालिकेने केले आहे. तरी नागरिकांनीही बिल वाटप करण्यासाठी येणाऱ्या महिलांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

banner

 

….

*चौकट*

 

*मालमत्ता कर भरण्याची ऑनलाइन सुविधा*

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आर्थिक वर्ष २०२५-२६ ची मालमत्ता कर बिले ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आली असून, करदात्यांना त्यांच्या नावावर नोंद असलेल्या मालमत्तांची बिले www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर पाहता व भरता येतील. तसेच मालमत्ता कर बिले ३० जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने बिले भरल्यास सामान्य करावर १० टक्के सवलत मिळणार आहे.

…..

*कोट*

 

बचत गटांच्या महिलांमार्फत मालमत्ता कर बिलांचे वाटप सुरू झाले आहे. यामुळे बचत गटांच्या महिलांच्या आर्थिक सक्षमतेस बळकटी मिळणार आहे. तसेच नागरिकांपर्यंत वेळेवर बिले पोहोचवण्याच्या उद्देशालाही चालना मिळणार आहे. नागरिकांनी देखील बिल वाटप करण्यासाठी येणाऱ्या महिलांना सहकार्य करावे.

 

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

कोट

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मालमत्ता कर विभागाचे बिल वाटप महिला बचत गटांच्या महिलांमार्फत करण्यात येत आहे. ३० जून २०२५ पर्यंत कर भरल्यास मालमत्ताधारकांना विविध सवलतींचा लाभ घेता येणार आहे. तरी जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी लवकरात लवकर कर भरून सवलतींचा लाभ घ्यावा.

 

– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?