Home शिरूरमहाराष्ट्र हेवन जिमनॅस्टिक अकादमीचे ९ खेळाडू एरोबिक जिमनॅस्टिक च्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.आँलंपीअन बाळकृष्ण आकोटकरांनच्या संघाला शुभेच्छा

हेवन जिमनॅस्टिक अकादमीचे ९ खेळाडू एरोबिक जिमनॅस्टिक च्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.आँलंपीअन बाळकृष्ण आकोटकरांनच्या संघाला शुभेच्छा

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
दिनांक २४ व २५ नोव्हेंबर तारखेला मुंबई मधील चेंबूर येथे २४व्या राज्यस्तरीय एरोबिक जिमनॅस्टिक या क्रीडा प्रकाराच्या स्पर्धांनचे आयोजन करण्यात आले आहे.या दोन दिवसीय स्पर्धेत ११,१४,१७ वर्षांखालील व खुल्यागटात स्पर्धा रंगणार आहेत.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false}

रहाटणी च्या हेवन जिमनॅस्टिक अकादमीच्या ९ खेळाडूंनची या सदर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या निमित्ताने दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सर्व खेळाडूंनचा आँलंपीअन बाळकृष्ण आकोटकरांनच्या हस्ते सत्कार करण्यात आला.अकोटकरांनी‌ खेळाडू व पालकांना त्यांच्या अनुभवातून प्रेरीत केले.या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू पुढिल प्रमाणे.राष्ट्रीय पदक विजेते वृंदा सुतार ही या स्पर्धेमध्ये खुल्या गटात वैयक्तिक महिला या प्रकारात सहभागी होणार आहे तर राष्ट्रीय खेळाडू परिजा क्षीरसागर १७ वर्षांखालील वयोगट,अन्वी पाटील व ईश्वरी कंठाळे १४ वर्षांखालील वयोगट तर राही फुलतांबकर व सिद्धी मारे ११ वयोगटात वैयक्तिक महिला या प्रकारात सहभागी होणार आहे.सानवी पाटिल,धानी पटेल व ईश्वरी कंठाळे हि १४ वर्षांखालील गटात तर इष्टि भटनागर, सिद्धी मारे व राही फुलतांबकर या तिहेरी या गटात आपले सादरीकरण करणार आहेत.संघास मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांनी केले असुन स्पर्धेत प्रशिक्षक म्हणून चैतन्य कुलकर्णी व आश्लेषा डहांगे संघाचे व्यवस्थापक म्हणून जबाबदारी बघणार आहोत.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“square_fit”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

संघटनेचे अध्यक्ष संजय मंगोडेकर, उपाध्यक्ष अलका तापकीर, सचिव संजय शेलार, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संजोग ढोले, ज्येष्ठ प्रशिक्षक मनोज काळे, संघटनेचे खजिनदार श्रद्धा शेलार, सहखजिनदार दीपक सुनारीया, हनुमंत आवटी, मोहन झुंझेपाटिल, पवनराज पाटिल,कौशल सुनारीया,अभीश्री रजपूत, शुभम भालेकर, प्रिया जोशी, अंकुश पाटिल, दयानंद पाटिल, श्रीकांत राठोड, गणेश नवले, लख्खन बगले, सतिश जाधव, संदीप शिंदे, धनाजी पाटील, तुषार भरगुडे, माजी नगरसेवक विनोद तापकीर, नवीन तापकीर, हेवन जिमनॅस्टिक अकादमीचे सर्व खेळाडू, पालक यांनी संघाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.ही माहिती अकादमीचे प्रमुख व्यवस्थापक व प्रशिक्षक चैतन्य कुलकर्णी यांनी दिली.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?