Home शिरूरमहाराष्ट्र गुढीपाडवा पट वाढवा” अभियानाचा म्हेत्रेवाडी प्राथमिक शाळेतून महापौर व आयुक्त यांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ

गुढीपाडवा पट वाढवा” अभियानाचा म्हेत्रेवाडी प्राथमिक शाळेतून महापौर व आयुक्त यांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी दि. १८ मार्च २०२६: राज्य शासनाच्या धोरणानुसार शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या (पट) वाढवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘गुढीपाडवा पट वाढवा’ या राज्यस्तरीय विशेष अभियानाचा शुभारंभ पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात उद्या, दि. १९ मार्च २०२६ रोजी महापौर रवि लांडगे व आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते होणार आहे. हा कार्यक्रम म्हेत्रेवाडी प्राथमिक शाळा येथे सकाळी ९.३० वाजता होणार आहे.

या कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर,शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर तसेच स नगरसदस्य,नगरसदस्या उपस्थित राहणार आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.‘गुढीपाडवा पट वाढवा’ या अभियानाच्या माध्यमातून इयत्ता पहिलीसह पुढील सर्व वर्गांमध्ये प्रवेश वाढवणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
सध्या इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी,यासाठी जनजागृती मोहिम राबविण्यात येणार असून पालकांमध्ये महानगरपालिका शाळांबाबत सकारात्मक विश्वास निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

या अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढवून सर्वसमावेशक आणि दर्जेदार शिक्षण व्यवस्था अधिक बळकट करण्याचा महापालिकेचा मानस आहे.

banner

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होणारे हे अभियान शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?