Home शिरूरमहाराष्ट्र आळंदीत डीजे मुक्त मिरवणुका व्हाव्यात शांतता कमेटी बैठकीत चर्चा

आळंदीत डीजे मुक्त मिरवणुका व्हाव्यात शांतता कमेटी बैठकीत चर्चा

ध्वनी प्रदूषण रोखण्यास संयोजकांना शांतता कमेटीचे आवाहन

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

आळंदी प्रतिनिधी आळंदी पंचक्रोशीत विविध उत्सव, जयंती दिनी अनेक मिरवणुका उत्साही जल्लोषात प्रथा परंपरांचे पालन करीत होतात. अनेक वेळा आळंदी पंचक्रोशीतील संयोजक ग्रामस्थ यांना पोलीस आणि स्थानिक पदाधिकारी ग्रामस्थ यांनी धार्मिक, सामाजिक उपक्रम प्रसंगी आवाहन केल्यानंतर ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी डीजे मुक्त मिरवणुका, उत्सव झाले आहेत. अशाच उपक्रमांचा आदर्श पुढील काळात कायम राहावा. या साठी सर्वच मिरवणुका, उत्सव डी.जे. मुक्त व्हावेत अशी चर्चा आळंदी शांतता कमेटीचे बैठकीत झाली. अंतिम निर्णयासाठी लवकरच सर्व समावेशक संयुक्त बैठक होत आहे. आळंदी पंचक्रोशीतील ध्वनी प्रदूषण रोखण्याचे उपाय योजनेत सहभागी होण्यास सर्व मिरवणुका, उत्सव संयोजकांना शांतता कमेटी तर्फे आवाहन करण्यात आले.
आळंदी पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमा नरके यांचे अध्यक्षतेखाली आळंदी शांतता कमेटीची बैठक खेळीमेळीचे वातावरणात पार पडली. या बैठकीत आळंदी नगरपरिषद लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, शांतता कमेटी सदस्य, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, प्रकाश कुऱ्हाडे, आनंदराव मुंगसे, उत्तमराव गोगावले, अर्जुन मेदनकर, मंगेश तिताडे, अजित वडगावकर, अँड. नाझीम शेख, सोहेल शेख, आरीफ शेख, हमीद शेख, इम्रान हकीम, निसार सय्यद, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे आदी उपस्थित होते.
या बैठकीत येत्या काळातील सार्वजनिक उत्सव गुढी पाडवा, रमजान ईद, श्री हनुमान जयंती, भगवान महावीर जयंती, श्री राम नवमी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी उपक्रम अनुषंगाने आळंदी पोलीस स्टेशन मध्ये शांतता कमेटीची बैठक पार पडली. या बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी नियोजित सणवार, जयंती दिनी चे उपक्रम, मिरवणुका, आदी धार्मिक, सामाजिक उपक्रम आदी बाबत उपस्थितांशी संवाद साधून मते जाणून घेत चर्चा केली. सर्व उपस्थितांशी संवाद साधून उपक्रमांची माहिती घेत शांतता सुव्यवस्था, पोलीस बंदोबस्त, मिरवणुकीचे मार्ग या बाबत माहिती जाणून घेत चर्चा केली. उपस्थितांनी आपापली मते व्यक्त करीत आळंदीत होणारे, उत्सव, मिरवणुका कायदा सुव्यवस्थेचे पालन करीत शांततेत होत असल्याचे सांगत अनेक कार्यक्रम, मिरवणुका या डी.जे मुक्त होत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी सांगितले.
आळंदीतील सार्वजनिक मिरवणुका डी. जे मुक्त होत असल्याचा आदर्श आळंदी मंडळातील इतर गावांनी देखील घेतला आहे. अनेक गावांतून डी.जे. मुक्त मिरवणुका होतात. रात्री उशिरा पर्यंत होणाऱ्या मिरवणुका अलीकडच्या काळात दहाच्या आत बंद केल्या जातात. या कार्यास स्थानिक पदाधिकारी, शांतता कमेटीचे सहकार्य आणि कार्यरत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना जाते असे त्यांनी सांगितले. या पुढील काळात पंचक्रोशीतील ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आळंदी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील सर्वच मिरवणुका, उत्सव, कार्यक्रम डी.जे. मुक्त व्हाव्यात या साठी बैठकीत सर्व संयोजकांना आवाहन करण्यात आले आहे. उपस्थित मान्यवरांनी बैठकीत आपापली भूमिका मांडत बैठक खेळी मेळीचे वातावरणात पार पडली. संयोजन पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांनी केले.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?