Home शिरूरमहाराष्ट्र आळंदीत श्री रामनवमी निमित्त श्री रामजन्मोत्सवाचे आयोजन

आळंदीत श्री रामनवमी निमित्त श्री रामजन्मोत्सवाचे आयोजन

आवेकर भावे रामचंद्र संस्थान ( ट्रस्ट ) तर्फे नारदीय कीर्तन श्रवण पर्वणी

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

आळंदी प्रतिनिधी आळंदी येथील आवेकर भावे रामचंद्र संस्थान (ट्रस्ट) तर्फे प्रथा परंपरांचे पालन करीत श्री राम नवमी निमित्त वर्षोकोत्सवात श्री रामजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त गुढी पाडवा ते श्री राम नवमी गुरुवार (दि. १९) ते गुरुवार (दि.२६) या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक, नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन आवेकर भावे रामचंद्र संस्थान ( ट्रस्ट ) तर्फे करण्यात आले आहे.
या वर्षीचा सोहळा हा आता १८६ व्या वर्षात प्रवेश करत आहे, ज्या मध्ये श्री राम मंदिरात संगीत, नृत्य, भजन, नारदीय कीर्तन आणि इतर पारंपारिक कार्यक्रमांचा समावेश आहे. कार्यक्रमात १९ मार्च ते २६ मार्च २०२६ पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक सोहळे दररोज आयोजित केले जातील.कार्यक्रमांत रुद्र-अभिषेक, नारदीय कीर्तन, भरतनाट्यम,भजन, रामलीला, संकीर्तन, भक्ति संगीत, आळंदीकर ग्रामस्थ गावकरी भजन सेवा आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाचा समारोप २६ मार्च २०२६ रोजी श्री राम जन्म कीर्तन आणि श्रींची पालखी नगरप्रदक्षिणा मिरवणुकीने होईल. हा उत्सव भक्तांमध्ये आध्यात्मिक विकास आणि सांस्कृतिक समृद्धी वाढविण्याचे उद्दिष्ट काय ठेवत आहे.संस्थानचे वतीने भाविक, नागरिकांना उत्सवात सहभागी होण्यासाठी आवाहन पंच मंडळाने केले आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?