प्रतिनिधी पिंपरी चिंचवड (दिनांक २६ जानेवारी २०२६) गणतंत्रदिन
श्री सदगुरू शिक्षण संस्था संचलित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अनु जाती मुला मुलींची आश्रम शाळा गंगानगर, फुरसुंगी भेकराईनगर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी संचालक पदाधिकारी, पालक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या
कार्यक्रमासाठी विश्वकर्मा अंगणवाडी श्रीम निशा भावे,पुर्व प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीम बडदे मॅडम, प्राथमिक मुख्याध्यापिका वैजयंती जाधव, मॅडम, माध्यमिक मुख्याध्यापक प्रतिनिधी श्रीम निगडे मॅडम, श्री अभिजित आढाव, व संस्था खजिनदार श्री राजेंद्र महामुनी, श्री.उत्तम साठे ग्रंथपाल सरस्वती ग्रंथालय ,श्रीम आढाव किर्ती वाचनालय, श्री मयुर खुळवे ,श्रीम श्राध्दे मॅडम,अनेक माजी सैनिक, पालक ,माजी विद्यार्थी,श्री प्रदीप पाटोळे, परिसरातील अंगणवाडी सेविका काही शिक्षिका मुले इ. उपस्थित होते .आश्रम शाळेत २६ जानेवारी कार्यक्रम ची सुरवात प्रस्तावना खजिनदार श्री राजेंद्र महामुनी यांनी करुन प्रतिमा पुजन, ध्वजारोहण, राष्ट्रगीत, ध्वजगीत,संविधान, इ.झाले सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली त्यावेळी अनेक मान्यवरांचे सत्कार झाले ,मुलांचे कवायत प्रकार, विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सुरवात केली मान्यवर भाषणे झाली श्री गवळी काका यांनी खुप छान बौद्धिक मार्गदर्शन केले.मुलांना खाऊ वाटप करून उपस्थितांचे चहापान करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थी ५६ ,शिक्षक कर्मचारी ११,संस्था पदाधिकारी मान्यवर तसेच ०५,नगरसेवक,नगरसेविका ( सभापती) १०,महिला १३,पुरुष १७, एकुण ११२ अशी उपस्थिती होती,कार्यक्रमाचे प्रतिमापुजन,श्रीफळ वाढवून श्री पप्पू दादा रोकडे वार्ड नगरसेवक (वतीने श्री संदिप काका हरपळे, संस्था खजिनदार श्री राजेंद्र महामुनी ज्येष्ठ श्री गवळी काका व इतर उपस्थित सभापती, नगरसेवक व नगरसेविका ),व ध्वज पुजन ध्वजारोहण वार्ड नगरसेविका श्रीम विशाखाताई हरपळे यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ नगरसेविका बांधकाम खाते सभापती श्रीम उषाकाकी ढोरे ,श्री सचिन देवकाते नगरसेवक,श्रीम स्नेहलताई जवंजाळ नगरसेविका,श्रीम लाळेताई सामाजिक कार्यकर्त्या,श्री आडसुळ सामाजिक कार्यकर्ते,श्री ह भ प लोंढे महाराज,श्री अजित क्षीरसागर बौध्दिक प्रमुख,श्री प्रशांत जगताप, श्रीराम शाखा गंगानगर,उपस्थित होते त्यांचाही स्वागत, सत्कार झाले,कार्यक्रम साठी नगराध्यक्ष श्री संतोष सरवदे,श्री सचिन हरपळे,स्थायी समीती व नियोजन सभापती,श्रीम स्नेहाताई हरपळे नगरसेविका,श्री गणेश ढोरे,नगरसेवक ,श्री गिरीश ढोरे,नगरसेवक, श्रीम श्रीम ललिता हरपळे नगरसेविका,यांनी प्रेरणा ,मार्गदर्शन केले,श्री कदम,श्री गवळी काका,श्री नितेश गायकवाड,श्री आशिष, श्री बनसोडे,पालक वर्ग,व माता भगिनी, मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,इतर मुलींनी मुलांनी कार्यक्रम साठी परिश्रम घेतले.संस्था अध्यक्ष महामुनी सर यांनी सर्वांना संस्थेचे चाललेले उपक्रम,सद्य स्थिती,व भावी वाटचाल याविषयी थोडक्यात माहिती दिली व आपल्या माध्यमातून येथे ३६ ते ४० जनांना नोकरी संधी मिळुन संसार उभे राहून ,२०० ते २६० मुलांच्या शिक्षणासाठी व राहण्यासाठी मोफत सोय उपलब्ध व्हावी, यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे, समस्या भरपूर आहेत पण आपली बाजुही समाज हिताची,सामाजिक बाजु सांगुन सर्वांनी कायमस्वरूपी मार्गदर्शन,मदत करा अनेक आमदार (जवळपास सर्व राजकीय पक्ष)श्री संजयजी जगताप सर, श्रीम वर्षाताई गायकवाड,श्री विजयजी शिवतारे साहेब,श्री भिमराव तापकीर,श्री योगेश टिळेकर,श्री चेतन तुपे पाटील,खासदार,श्री गिरीशजी बापट,श्री मुरलीधर अण्णा मोहोळ,मुख्यमंत्री,श्री एकनाथ जी शिंदे साहेब श्री देवेंद्र जी फडणवीस साहेब,उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब,महाराष्ट्र शासन,केद्रीय सामाजीक न्याय खाते श्री रामदासजी आठवले साहेब,भारत सरकार,अश्या अनेकांनी आपल्या काळात आपल्या स्थरावरुन शिफारशी दिल्या आहेत ,आपण ही सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली .चाललेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. आणि सर्वांना धन्यवाद दिले.
गंगानगर,फुरसुंगी,पुणे,आश्रम शाळा येथे ७७ वा गणतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा
24