पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वाधिक निवडणूक प्रशिक्षण कै.अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी सत्रात पार पडले
भोसरी दिनांक (१० जानेवारी) २०२६ पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने प्रभाग क्र.३,४,५ व ७ करिता नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह,भोसरी येथे दोन सत्रात पार पडले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिप्ती सूर्यवंशी,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण ढमाले,तानाजी नरळे,सुर्यकांत मोहिते, इ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता शिवाजी वाडकर यांच्यासह २४८ मतदान केंद्रांवर नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
दोन सत्रांमध्ये पार पडलेल्या प्रशिक्षणामध्ये उपस्थितांना संगणकीय सादरीकरणाद्वारे मतदान केंद्रावर जाताना तसेच मतदानाचे दिवशी घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती देण्यात आली.तसेच मतदान प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पाडव्याच्या कर्तव्यांबाबत देखील माहिती देण्यात आली. यामध्ये मतदान यंत्रांची जोडणी,मॉक पोल प्रकिया, मतदान प्रक्रियेच्या विविध टप्प्यावर घ्यावयाची खबरदारी तसेच निवडणूक साहित्य प्राप्त करणे,त्याची तपासणी करणे व निवडणूक साहित्य जमा करणे इ.बाबत देखील माहिती देण्यात आली.
