पिंपरी चिंचवड प्रतिनिधी (दिनांक 20 मे 2026) विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारांची निवडणूक जाहीर झाली असून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार की भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसला कडे येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास विठोबा लांडे यांच्या अनेक समर्थकांनी मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन विलास लांडे यांना विधान परिषदेची संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली माजी शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, दीपक साकोरे,सचिन आवटे, यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन पिंपरी चिंचवड मध्ये भाजपचे पाच आमदार आहेत त्यानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षाची ताकद पिंपरी चिंचवड मध्ये असताना विधानपरिषदेवर पिंपरी चिंचवडला संधी दिल्यास राष्ट्रवादीची ताकद निर्माण होऊन शकते विलास लांडे यांनी हवेली व भोसरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अतिशय उत्तम प्रकारे केले असून अनिल भोसले यांना विधान परिषद उमेदवारी देताना त्यांना डावले अशी आठवण शिक्षण मंडळाची मा.धनंजय भालेकर यांनी करून दिली
विलास लांडे यांना विधान परिषदेची उमेदवारी द्या धनंजय भालेकर
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची समर्थकांनी घेतली भेट
21