पिंपरी दिनांक.२१ डिसेंबर २०२५
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या अनुषंगाने मा. निवडणूक निर्णय अधिकारी – प्रभाग क्र. १,११,१२,१३ यांनी मार्गदर्शन बैठकीचे आयोजन केले असून प्रसिध्दीस देणेबाबत.
फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत राजकीय पक्षाचे उमेदवार, इच्छुक अथवा निवडणूक प्रतिनिधी यांची उद्या आयोजित बैठक.
उपरोक्त विषयास अनुसरुन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या अनुषंगाने मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग क्र. १,११,१२,१३ यांनी संबधित प्रभागाकरीताचे विविध पक्षाचे उमेदवार, इच्छुक आणि निवडणूक प्रतिनिधी यांना विविध विषयावर मार्गदर्शन बैठकीचे आयोजन केले आहे. तरी, *प्रभाग क्र.१, ११, १२ व १३ चे राजकीय पक्षाचे उमेदवार, इच्छुक अथवा निवडणूक प्रतिनिधी यांनी सोमवार, दि.२२/१२/२०२५ रोजी दुपारी ०३.०० वाजता मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, घरकुल टॉऊन हॉल, चिखली* येथे उपस्थित रहावे असे आवाहन सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी केले आहे.