Home शिरूरमहाराष्ट्र नगरपरिषद व नगरपचांयतच्या सार्वत्रिक निवडणूकीस १ डिसेंबर पर्यंत प्रचार करता येणार तसेच २ डिसेंबर मतदानासाठी सुट्टी जाहीर : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती 

नगरपरिषद व नगरपचांयतच्या सार्वत्रिक निवडणूकीस १ डिसेंबर पर्यंत प्रचार करता येणार तसेच २ डिसेंबर मतदानासाठी सुट्टी जाहीर : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती 

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

आळंदी प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान सुरु होणार असून प्रचार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता बंद करण्यात यावे ; प्रचार बंद झाल्याच्या वेळेपासून सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी, प्रसारण देखील बंद करावे. जिल्ह्यातील उमेदवारांनी आयोगाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. . . नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत पात्र मतदारांना मतदान करता यावे याकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, माळेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे आणि वडगाव या नगरपरिषद व नगरपचांयतीच्या मतदार संघात सुट्टी असणार आहे.

मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्यांना मतदारांना देखील लागू राहणार आहे. केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील, येत्या 2 डिसेंबर रोजी पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.

banner

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?