पिंपरी-चिंचवड, रविवार: पिंपळे सौदागर परिसराचा समावेश असलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक २८ मधून आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे निष्ठावान आणि ध्येयनिष्ठ कार्यकर्ते श्री. विशाल अनंतराव जाधव यांनी इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातून उमेदवारीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष आणि ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष या दुहेरी जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळणारे विशाल जाधव हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे ‘माणूस म्हणून’ ओळखले जातात.
पवार साहेबांचा ‘पिंपरी-चिंचवड पॅटर्न’ पुढे नेणारा नेता!
पिंपरी-चिंचवड शहराला आधुनिक महाराष्ट्राची ‘विकास नगरी’ बनवण्यात पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांचे योगदान अनमोल आहे. साहेबांनी या शहराला दिलेल्या दूरदृष्टीमुळे येथे उद्योग, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचा विकास झाला आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग या शहरात स्थायिक आहे.
विशाल जाधव यांनी साहेबांच्या विचारांवरची त्यांची निष्ठा केवळ भाषणातून नव्हे, तर कृतीतून सिद्ध केली आहे. पिंपळे सौदागर येथे त्यांनी साहेबांच्या नावाने सुरू केलेला ‘शेतकरी आठवडे बाजार’ हा केवळ एक उपक्रम नसून, साहेबांच्या शेतकरी-केंद्री धोरणांना त्यांनी दिलेली आदरांजली आहे. पवार साहेबांचा आशीर्वाद आणि त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन मैदानात उतरल्याने, विशाल जाधव यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळेल, अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आहे.
दोन दशकांहून अधिक काळची राजकीय आणि सामाजिक तपश्चर्या
श्री. विशाल जाधव यांचा राजकीय प्रवास १० जून १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्रिय व क्रियाशील कार्यकर्ते म्हणून सुरू झाला. महात्मा फुले महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आघाडी घेतली.
युवा नेतृत्व: २००० मध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या वतीने विद्यार्थी शहराध्यक्ष निलेश डोके यांच्या नेतृत्वात महाविद्यालयीन जीवनात सक्रिय सहभाग.
ओबीसी संघटन: २०११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग, पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष म्हणून आनंदा कुदळे यांच्या नेतृत्वात तर २०१५ मध्ये ईश्वर बाळबुद्धे (प्रदेशाध्यक्ष) यांच्या नेतृत्वात प्रदेश सचिव म्हणून सक्रिय पदभार व जबाबदारी पार पाडली.
सध्याची जबाबदारी: २०२२ पासून पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाच्या शहराध्यक्षपदी जबाबदारी सांभाळत आहेत, तर २०२४ मध्ये ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राजू राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
विशाल जाधव यांनी शिव-फुले-शाहू-आंबेडकर या विचारधारेचा बाईक म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात ओळख निर्माण केली आहे. तसेच, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री उपदेशाप्रमाणे केवळ शहरात नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी कार्याचा ठसा उमटवला आहे.
सर्वसमावेशक विवाह सोहळे: ‘जाणीव फाउंडेशन’ अंतर्गत नवमहाराष्ट्र महाविद्यालय, पिंपरी येथे सलग चार वर्षे सर्व जाती-धर्मातील सामुदायिक विवाह सोहळ्याचे यशस्वी आयोजन.
संवेदनशील उपक्रम: शिव शंभो सेवा सभागृह, पिंपळे सौदागर येथे मूकबधिर जोडप्यांचे विवाह आणि ‘नारी द वुमन’ संस्थेच्या माध्यमातून इतिहासात पहिल्यांदा तृतीय पंथीय (Third Gender) यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा ऐतिहासिक निर्णय.
शिक्षणासाठी योगदान: जीजस्वी एज्युकेशन सोसायटी, पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय. तसेच लॉन्ड्री संघटनेच्या वतीने दरवर्षी दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा. |
सामाजिक जाणीव: राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने दरवर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व कला क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष गुणगौरव कार्यक्रम आयोजित करतात. |
स्वच्छता आणि आदर: पिंपरी चिंचवड शहर लॉन्ड्री संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून दरवर्षी शहरातील सर्व महामानवांच्या पुतळ्यांचे स्वच्छता अभियान राबवतात. |
विशाल जाधव हे ओबीसी संघर्ष समिती पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष पदावर सक्रिय कार्यरत आहेत. त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्क व न्यायासाठी समाजामध्ये वेगवेगळ्या आंदोलनांचे नियोजन केले आहे.
संघटनेचे कार्य: ‘युवा प्रदेशाध्यक्ष बारा बलुतेदार महासंघ महाराष्ट्र’ या पदावर कार्यरत असताना त्यांनी महाराष्ट्रातील बलुतदारांच्या संघटनेसाठी मोठे कार्य केले आहे. तसेच, शासकीय योजना बलुतेदार व इतर मागासवर्गीय समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
जागरूक प्रचार: अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी बारामती, मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सक्रिय प्रचार केला. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये ओबीसी समाजाला जागृत करून जास्तीत जास्त मतदान करून घेतले.
निवडणूक अनुभव: प्रभाग क्रमांक २८ मध्ये २०१७ साली इतर मागासवर्गीय प्रवर्गातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे त्यांना प्रभागातील नागरिकांच्या गरजा आणि समस्यांची सखोल जाणीव आहे.
श्री. विशाल जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विकासाच्या दृष्टिकोनावर आणि माझ्या २५ वर्षांच्या निस्वार्थ सेवेवर विश्वास ठेवून मला संधी द्या. प्रभाग क्रमांक २८ च्या सर्वांगीण विकासासाठी आणि ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी मी सदैव कटिबद्ध राहीन!”
