Home शिरूरमहाराष्ट्र भाई विशाल जाधव यांची राज्य निवडणूक प्रभारी म्हणून विशेष जबाबदारी 

भाई विशाल जाधव यांची राज्य निवडणूक प्रभारी म्हणून विशेष जबाबदारी 

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाच्या ओबीसी सेल, महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या (जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि महानगरपालिका) पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. पक्षाने निष्ठावान ओबीसी कार्यकर्त्यांना योग्य संधी देण्यासाठी निवडणूक तयारीला वेग दिला असून, माननीय सलीम बेग आणि भाई विशाल जाधव यांची राज्य निवडणूक प्रभारी म्हणून विशेष जबाबदारीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

राज राजापूरकर यांनी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी या संदर्भात पक्षाच्या इतर मागासवर्गीय प्रवर्ग विभागाच्या (OBC सेल) अध्यक्ष/कार्याध्यक्षांना एक पत्र जारी केले आहे. या पत्रानुसार, पक्षाचे नेते आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांच्या दूरदृष्टिपणामुळे पक्ष मूळ ओबीसी कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यासाठी कटीबध्द आहे.

निवडणूक प्रभारी: माननीय सलीम बेग (भ्रमणध्वनी: ८६८९९६५५५५) आणि भाई विशाल जाधव (भ्रमणध्वनी: ९३२२२२४४७७) यांच्याशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या संपर्क साधून सहकार्य करावे. जिल्हा आणि तालुका स्तरावरील ओबीसी प्रवर्गातून खुल्या व महिला आरक्षित जागांसाठी निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची यादी तातडीने तयार करावी. तयार केलेली यादी दिनांक २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्रदेशाध्यक्ष माननीय राज राजापूरकर साहेब यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. ही यादी जिल्हाध्यक्षांच्या अधिकृत लेटरहेडवर सुपूर्द करावी.

राज राजापूरकर यांनी जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि सरचिटणीस यांना निष्ठावान आणि पात्र ओबीसी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी ही यादी लवकरात लवकर आणि अचूकपणे तयार करून पाठवण्याची नम्र विनंती केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये (२०२५-२०२६) ३२ जिल्हा परिषदा, ३३६ पंचायत समित्या आणि २९ महानगरपालिकांच्या निवडणुका अपेक्षित आहेत.

banner

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?