Home शिरूरमहाराष्ट्र गणेश उत्सवात भक्ती, उत्साहाबरोबर सतर्कता,खबरदारी,तारतम्य,शिस्त हि महत्वाची!

गणेश उत्सवात भक्ती, उत्साहाबरोबर सतर्कता,खबरदारी,तारतम्य,शिस्त हि महत्वाची!

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

दि.६ सप्टेंबर २०२५

दहा दिवस विधिवत अत्यंत भक्तीमय व भावपूर्ण वातावरणात बाप्पांची पूजा करून आज भावपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पांना निरोप देण्याचा दिवस आहे.

 

महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे यावर्षी अनेक इच्छुक उमेदवारांनी सार्वजनिक मंडळांना घरपोच चांगल्या देणग्या दिल्या आहेत. सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीच्या तयारी देखील झालेल्या आहेत. यावर्षी सगळेच जोरात आहेत.

banner

 

गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आमच्या मोहननगर मधून आमच्या शेजारील रामनगर दत्तनगर विद्यानगरच्या सार्वजनिक मंडळाच्या मिरवणुका जात असताना काल अत्यंत दुर्दैवी व प्राणघातक दुर्घटना घडली. या सर्व मिरवणुका मोठमोठे डीजे लावून काढण्यात आल्या होत्या. मोहननगर मधील मनपा शाळा रस्त्यावरील ट्रान्सफॉर्मरला डीजेचा काही भाग चिकटल्यामुळे डीजे वर असणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना विजेचा जबरी शॉक लागून हे कार्यकर्ते वरून खाली पडुन गंभीर जखमी झाले. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी पुढे मागे मिरवणूक असल्यामुळे जखमी कार्यकर्त्यांना आमच्या मंडळाच्या मागच्या बाजूकडून (महात्मा फुले नगर मधून) निरामय हॉस्पिटला या कार्यकर्त्यांना कसेबसे उपचारासाठी नेण्यात आले. सुदैवाने त्यांची परिस्थिती गंभीर आहे मात्र जीव वाचला आहे. ते लवकर बरे व्हावेत हीच गणराया चरणी मनोभावे प्रार्थना.

 

आज पिंपरी चिंचवड शहरासह संपूर्ण राज्याच्या सर्व सार्वजनिक मंडळाच्या विसर्जन मिरवणूक मोठ्या दिमाखात भक्ती भावाने व उत्साहवर्धक वातावरणात संपन्न होणार आहेत. या मिरवणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी कुठेही या विसर्जन मिरवणुकांमध्ये गालबोट लागेल, अपघात होईल, कोणाच्या प्राणाला धोका निर्माण होईल याबाबत खबरदारी घेत,सतर्क रहात आप आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. आडवा आडवी व जिरवा जिरवीच्या भानगडीत न पडता एकमेकांच्या आदर करून, समंजसपणे रस्ता करून देणे, व्यसन न करणे, नाचण्यावरून लहान मोठा वाद झाला असेल तर तो सामंजस्याने मिटवणे, ज्या मार्गावरून मिरवणुका जाणार आहेत त्या ठिकाणचे ट्रांसफार्मर ,वीज वाहिन्या याबाबत खबरदारी घेणे, डीजेवर ट्रॅक्टवर उभे राहून डान्स न करण्याबाबत खबरदारी घेणे, मिरवणुकांमध्ये असणाऱ्या वाहनांमुळे अपघात होणार नाही याची खबरदारी घेणे. नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे, बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्याची भूमिका ठेवणे, त्यांच्या सूचनांचा आदर करणे.

 

सर्व सार्वजनिक मंडळांच्या अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या सर्व खबरदार्या व सतर्कता बाळगुन कालच्या दुर्दैवी अपघाताप्रमाणे कुठलीही घटना घडू नये याची जातीने काळजी घ्यावी ही सर्व सार्वजनिक मंडळांच्या अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नम्र विनंती.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?