Home शिरूरमहाराष्ट्र तळवडे गावच्या ज्योतिबा मंदिरात भाविकांची तुफान गर्दी

तळवडे गावच्या ज्योतिबा मंदिरात भाविकांची तुफान गर्दी

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड तळवडे प्रतिनिधी (दिनांक २ नोव्हेंबर २०२५) तळवडे ज्योतिबा नगर येथे दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने झालेल्या ज्योतिबा मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी पाहण्यास मिळाली दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मंदिरावरती विविध प्रकारची विद्युत रोषणाई केली होती वेग वेगळ्या प्रकारची सजावट करण्यात आली होती मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ विशेषतः आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती

मंदिरामधील भक्ती भावाने सेवा करणारे सेवेकरी भाविक भक्त अतिशय उत्साहाने आपल्या जबाबदारीने कर्तव्य पार पाडत होते मंदिराचे पुजारी नवनाथ महाराज भालेकर महाराजांनी अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन करताना सांगितले की केदारनाथ दर्शनासाठी अनेक जिल्ह्यातील व तालुक्यातील भाविक भक्त ज्योतिबा केदारनाथ दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी मार्ग काढत असतो मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक माझ्या भक्तांना केदारनाथ महाराजांच्या कृपेने साक्षात अनुभव आलेला आहे. अनेक भाविक भक्तांना संकष्ट पासून दूर करण्यासाठी जी शक्ती माझ्यामध्ये माझ्या गुरूंनी व केदारनाथ भगवान ने दिली त्या शक्तीचा वापर करत आहे मी माझ्या भक्तांना मार्गदर्शन करत असतो अनेक भाविक भक्तांनी याचा प्रत्यक्षात अनुभव घेतलेला आहे. व घेत आहेत अनेक भक्त मंदिरामध्ये मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात ज्योतिबा मंदिरामध्ये प्रत्येक महिन्यात नवनाथ पारायण, गुरुचरित्र पारायण, साखळी पारायण, शिवलीला अमृत केदार, विजय असे काही ग्रंथ आहेत या ग्रंथाच्या माध्यमातून पारायण नामस्मरण केले जाते गेल्या तीन वर्षांमध्ये ५८ हजार पारायण केलेले आहेत व ९० लाख स्वामींचा जप झालेला आहे.दर वर्षी चैत्र महिन्यामध्ये पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो असे नवनाथ महाराज यांनी सांगितले.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?