Home शिरूरमहाराष्ट्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरिकांच्या ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरिकांच्या ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त

पिंपरी, १३ ऑक्टोबर २०२५ :- महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले.

 

आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे ६, ८, ११, १४, ९, ८, २ आणि १० अशा एकूण ६८ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

 

banner

यावेळी नागरिकांनी दसऱ्यानिमित्त शहरात अवैद्य पद्धतीने लावलेले बॅनर काढणे, निगडी ते मोरवाडी दरम्यान होणारी वाहतूक कोंडी सोडविणे, दिवाळी निमित्त शहरात शहरात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे, नाशिक फाटा येथे नागरिकांच्या सोयीसाठी खाजगी बस थांबा निर्माण करणे, शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, उद्यानातील स्वच्छतागृहांची स्वच्छता करणे, आदी तक्रार वजा सूचना जनसंवाद सभेत नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

 

या उपक्रमामुळे नागरिकांच्या सहभागातून प्रशासन अधिक पारदर्शक व जबाबदार होईल, तसेच शहरातील नागरी सुविधांच्या उन्नतीस गती मिळेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?