Home शिरूरमहाराष्ट्र राजेंद्रजी गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन.

राजेंद्रजी गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन.

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

चाकण प्रतिनिधी दिनांक २८ फेब्रुवारी २०२६) चाकण – येथील उद्योजक आदिराज ग्रुपचे डायरेक्टर व चाकण नगर परिषदेचे प्रथम उपनगराध्यक्ष राजेंद्रजी गोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आदिराज ग्रुपच्या वतीने कंपनीतील स्टाफ,फिल्ड टीम तसेच सुपरवायझर यांचा आनंद द्विगुणीत होण्यासाठी चांदुस कोरेगाव येथील योगेश धायवर क्रीडा संकुल येथे भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

रोजच्या दैनंदिन जीवनातील ससे हेलपट तसेच कंपनीतील कामाच्या जबाबदाऱ्या यात व्यस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही एक दिवशीय क्रिकेट स्पर्धा आनंदाची पर्वणीच ठरली राजेंद्र गोरे यांनी बक्षीस वितरणा वेळी बोलताना सांगितले की आदिराज कंपनीत काम करत असलेला प्रत्येक कर्मचारी हा येथे कामाची जबाबदारी पार पाडत असला तरी तो एक कुटुंबातील,समाजातील एक घटक आहे.

त्याचे व्यक्तिगत, सामाजिक जीवनमान उंचावे यासाठी आपल्याला अजून काय प्रयत्न करता येईल याचा विचार पुढील काळात करत असल्याचे गोरे यांनी सांगितले भव्य, दिव्य चषक, ट्रॉफी व मिडल अशा स्वरूपाची बक्षिसे स्वीकारताना आदिराज ग्रुपच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर बक्षीस वितरण वेळी आनंद खुलून दिसत होता. स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी वसंत राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?