Home शिरूरमहाराष्ट्र सांगलीमध्ये माहिती अधिकार दिन साजरा करण्याच्यादृष्टीने अनोखा उपक्रम

सांगलीमध्ये माहिती अधिकार दिन साजरा करण्याच्यादृष्टीने अनोखा उपक्रम

माहिती अधिकार दिनानिमित्त सांगलीत जनजागृती करण्याचे केले आव्हान  

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

(२४ सप्टेंबर २०२५) रोजी जागतिक माहिती अधिकार दिन २८ सप्टेंबर रोजी असल्याने सांगलीत जनजागती अनोखा अभियान राबविण्यात आला या अभियानाच्या निमित्ताने ऑटो रिक्षा युनियनच्या सदस्यांनी अनेक नागरिकांच्या यांच्या वतीने जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी शंभर रिक्षा पेक्षा अधिक माहिती अधिकार कार्यकर्ते घोषवाक्य प्रबोधन पोस्टर लावून या भागात अभियानाची सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ते जुना बुधवार रोडवरील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ मार्गदर्शक समाजसेवक वि. द. बर्वे, यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत गाजरे व अमित गुरव यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी

समाजसेवक शाहीन शेख यांनी माहिती अधिकाराच्या प्रभावाबाबत भाष्य करताना सांगितले की, “हा कायदा सर्वसामान्यांसाठी व सामान्यतला सामान्य नागरिक नागरिकाला या कायद्याची माहिती घेऊन कायदे तज्ञ बनवतो. माहिती संशोधनाच्या आधारे अन्यायी व्यवस्थेवर चिकित्सा करणारा समाज निर्माण करण्याची आज काळाची गरज आहे.”

यावेळी समाजसेवक बर्वे म्हणाले, “भ्रष्ट प्रवृत्तीच्या विरोधात लोकहिता साठी कायद्याचा संघटित वापर होणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी व नोकरशाहीमधील प्रामाणिक सज्जनशक्तीच्या बळकटीसाठी व्यापक जनजागृती हाच खरा मार्ग आहे.”

“माहिती अधिकाराची लेखणी, करेल जनहिताची मांडणी!” तसेच “माहिती अधिकार कशासाठी? हक्कासाठी न्यायासाठी!” अशी घोषवाक्ये असलेले फलक रिक्षांवर लावण्यात आले. नंतर रिक्षांची फेरी काढून माहिती अधिकाराच्या माध्यमातून जनजागृती विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी उपस्थितांना माहिती अधिकार विषयक पुस्तिकांचे वितरणही मोठ्या प्रमाणात करण्यात आले.

banner

शेख यांनी शासनाने माहिती अधिकार दिन सुट्टीमुळे २९ सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा घेतलेला निर्णय योग्य व स्वागतार्ह असल्याचे सांगून अभिनंदन ठराव मांडला.

उपक्रमाचे नेतृत्व पै. प्रदीप (चंदू) पाटील, प्रमोद माळी, बालम मुजावर, दिलीप पाटील, विनोद कदम, उदय कोळी, वसंत खांडेकर, आयुब सुतार, साहेबपीर पिरजादे, सातलिंग कोष्टी, आरिफ शेख, विजय कोळी, सुरेश सूर्यवंशी, सारिका कुलकर्णी, बापू कांबळे, दत्ता मदने, दीपक कांबळे, यासीन मुल्ला, बबन चव्हाण, रमजान खलिफा, गणेश लोकरे, सुनील पवार, आफरीन खलिफ आदींनी केले.

या वेळी विविध संस्था व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?