Home शिरूरमहाराष्ट्र महापालिकेच्या दापोडी व गवळीमाथा ‘झिरो वेस्ट स्लम’ उपक्रमातून कचरा व्यवस्थापनात प्रभावी कामगिरी

महापालिकेच्या दापोडी व गवळीमाथा ‘झिरो वेस्ट स्लम’ उपक्रमातून कचरा व्यवस्थापनात प्रभावी कामगिरी

झिरो वेस्ट स्लम उपक्रमांतर्गत २४ दिवसांमध्ये ९१६ टन कचऱ्याचे करण्यात आले सुरक्षित व्यवस्थापन

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी, (दिनांक २४ मार्च २०२६) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दापोडी व गवळीमाथा येथील ‘झिरो वेस्ट स्लम’ उपक्रमांतर्गत कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि शाश्वत पद्धतीने होत आहे. या उपक्रमांतर्गत १ मार्च २०२६ ते २४ मार्च २०२६ या काळात तब्बल ९१६ टन कचऱ्याचे सुरक्षित व्यवस्थापन करण्यात आले आहे.

महापौर रवि लांडगे, उप महापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तर उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहा.आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, पूजा दुधनाळे यांच्या अधिपत्याखाली दापोडी व गवळीमाथा येथे राबविण्यात येणाऱ्या ‘झिरो वेस्ट स्लम’ उपक्रमांतर्गत कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि शाश्वत पद्धतीने होत असल्याचे दिसून येत आहे.

आरोग्य विभागाकडील आकडेवारीनुसार या उपक्रमांतर्गत १ मार्च २०२६ ते २४ मार्च २०२६ या कालावधीत जवळपास ९१६ टन कचरा संकलन करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे ६२०.३८ किलो सुका कचरा, ३.२९ टन ओला कचरा, तसेच २८०.५० किलो सॅनिटरी कचरा संकलित करण्यात आला आहे. याशिवाय ११.९५ किलो घातक घरगुती कचऱ्याचे सुरक्षित व्यवस्थापन करण्यात आले आहे.

गेल्या २४ दिवसात दापोडी तसेच गवळीमाथा येथील महिन्याभरात तब्बल ९ हजार ९९४ घरांपर्यंत ‘झिरो वेस्ट स्लम’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला असून या उपक्रमामुळे कचरा विलगीकरण, संकलन आणि विल्हेवाट प्रक्रियेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. या उपक्रमांतर्गत कचऱ्याचे स्रोतावरच विलगीकरण, पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती यावर विशेष भर दिला जात असून, वसुंधरापूरक आणि स्वच्छ शहराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे.

banner

नागरिकांनी आपला घरगुती कचरा हा ओला, सुका कचरा, घरगुती घातक, सॅनिटरी कचरा वेगळा देऊन आणि कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे पालन करून या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.

दापोडी व गवळीमाथा ‘झिरो वेस्ट स्लम’ उपक्रमामुळे स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक बदल होत असून, हा उपक्रम शहरासाठी आदर्श ठरत आहे.
-रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

कचरा व्यवस्थापनात शाश्वत पद्धतीचा अवलंब करण्यासाठी ‘झिरो वेस्ट स्लम’ ही संकल्पना प्रभावी ठरत असून, भविष्यातही अशा उपक्रमांचा विस्तार करण्यात येणार आहे.
-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
…..

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन. पिंपरी चिंचवड (दिनांक १४ एप्रिल २०२६) डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अफाट सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सक्षमीकरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, सन्मानास पात्र आहे. समानता, न्याय आणि सर्वांप्रति आदर यावर आधारित समाजाचे त्यांचे ध्येय आपण पुढे नेऊया. असे निरूपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले, आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढून शिक्षण, संघटना आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि शोषितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देत राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा. नगरसेवक पंडीत गवळी,ॲड गोरक्ष लोखंडे, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, नगरसेविका वर्षा जगताप, योगिता बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, संभाजी बारणे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, सरचिटणीस नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?