Home शिरूरमहाराष्ट्र आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते कृष्णानगरात ५१ फुटी भगव्या ध्वजाचे राष्ट्रार्पण!

आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते कृष्णानगरात ५१ फुटी भगव्या ध्वजाचे राष्ट्रार्पण!

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) दिनांक २० मार्च २०२६)
प्रभाग क्रमांक ११ मधील कृष्णानगर येथे गुरुवारी सायंकाळी सहा वाजता देशभक्ती, हिंदुत्व आणि अभिमान यांचा संगम अनुभवायला मिळाला. तब्बल ५१ फुटी भव्य भगव्या ध्वजाचे राष्ट्रार्पण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात (दि.१९) पार पडले.या भव्य सोहळ्याचे ध्वजारोहण हिंदुत्ववादी आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते तर सचिन भैय्या लांडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. भगव्या ध्वजाने आकाशात झेप घेताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत अभिमान व्यक्त केला.या उपक्रमामागे जगदंब प्रतिष्ठान कृष्णानगर यांची संकल्पना असून, स्थानिक नगरसेविका रिटाताई सचिन सानप आणि सामाजिक कार्यकर्ते सचिनदादा सानप यांच्या पुढाकारातून हा सोहळा साकारला गेला.

या वेळी आमदार महेश दादा लांडगे, कामगार नेते सचिन भैय्या लांडगे, नगरसेवक निलेश दादा नेवाळे, नगरसेवक कुंदन भाऊ गायकवाड, नगरसेवक योगिताताई नागरगोजे, पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे,अमित जावळे, अजय भाऊ सायकर, महादेव कवितके, अरुण पाडुळे, अजय साने, संतोष ठाकूर, विनोद रोकडे, अशोक खराबे, हिंदुराव पाटील, पोपट हजारे, सुधाकर धुरी, अशोक मगर, अनिल सोमवंशी, ऋषिकेश जाधव, गणेश भुजबळ, पन्नालाल जाधव, सुनीता जगताप, कविता हिंगे यांच्यासह जगदंब प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते तसेच परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भव्य ध्वजारोहण सोहळ्यामुळे कृष्णानगर परिसरात एक नवीन उत्साह संचारला असून, हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचा संदेश अधिक बळकट झाला अशी भावना नगरसेविका रिटाताई सानप यांनी व्यक्त केली.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?