Home शिरूरमहाराष्ट्र मराठी पत्रकार परिषद पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सागर सूर्यवंशी यांची निवड

मराठी पत्रकार परिषद पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सागर सूर्यवंशी यांची निवड

अनिल वडघुले यांची राज्य कार्यकारणीच्या सदस्य पदी नियुक्ती

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

| प्रतिनिधी | पिंपरी-चिंचवड, (दिनांक १६ मार्च २०२७) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, विश्वस्त श्री शरद पाबळे, अध्यक्ष श्री मिलिंद अष्ठीवकर, जिल्हा अध्यक्ष श्री सुनील लोणकर, राज्य उपाध्यक्ष श्री गणेश मोकाशी या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शक सूचना आणि निरीक्षणाने काल दिनांक १५ मार्च २०२६ रोजी परिषदेच्या पुणे जिल्हा अध्यक्षांच्या सहीने अधिकृत पत्राद्वारे सागर गोपाळ सूर्यवंशी यांची पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच संस्थापक व माजी अध्यक्ष अनिल वडघुले यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणी सदस्यपदी बढती करण्यात आली. आज दिनांक १६ मार्च २०२६ रोजी पिंपरी येथे झालेल्या अभिनंदन बैठकीत दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून उपस्थितांनी आपापली मनोगते व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. निवड पत्रात नमूद केल्याप्रमाणे पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या मागील कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्याने मागील कार्यकारिणी बरखास्त केली आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष सागर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर होणार असल्याचे पत्रकार संघाचे सदस्य आणि डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष विनय सोनवणे यांनी सांगितले.

मागील दोन बैठकांमध्ये पत्रकार संघाच्या आयोजित बैठकीत उपस्थित सदस्यांच्या मताने आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष यांच्या निरीक्षणात झालेल्या तिसऱ्या बैठकीत उपस्थित सदस्यांच्या सर्वानुमते झालेल्या ठरवला अनुसरून आणि गेली तीन वर्षांपासून संघटनेसाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीची दखल घेऊन सूर्यवंशी यांची निवड समर्पक आणि योग्य असल्याच्या भावना आजच्या अभिनंदन बैठकीत उपस्थित पदाधिकारी आणि सदस्यांनी व्यक्त केल्या. सागर सूर्यवंशी यांच्या निवडीमुळे पत्रकार संघटनेला सक्षम नेतृत्व मिळाल्याचे शहरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांनी शुभेच्छा देतांना भावना प्रगट केल्या.
सागर सूर्यवंशी हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी सामाजिक,राजकीय आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने काम केले आहे.पत्रकारांच्या विविध समस्यांवर आवाज उठविणे, पत्रकारांच्या हक्कांसाठी,न्यायासाठी प्रयत्न करणे तसेच समाजातील घडामोडी लोकांपर्यंत पोहोचविण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. पुढील काळात पत्रकारांचे प्रश्न सोडविणे, पत्रकारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, पत्रकारांच्या घरासाठी, आरोग्य विमा तसेच पत्रकार भवन उभे करण्यासाठी आणि पत्रकार संघाची ताकद वाढविणे यासाठी प्रयत्न करणार तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि संलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या ध्येय धोरणांशी अधीन राहून उत्तम कार्य करू असे सागर सूर्यवंशी यांनी यावेळी बोलून दाखवले.

यावेळी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे व डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी, पत्रकार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघ अधिक बळकट होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सागर सूर्यवंशी व नवनिर्वाचित परिषद सदस्य अनिल वडघुले यांनी उपस्थित राहून अभिनंदन व शुभेच्छा स्वीकार केल्या. परिषदेचे राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशी, जिल्हा संघटक चिराग फुलसुंदर, जिल्हा समन्वयक मारुती बानेवार, डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड अध्यक्ष विनय सोनवणे, उपाध्यक्ष संतोष गोतावळे,अशोक कोकणे,महावीर जाधव,सिद्धार्थ चौधरी, हनुमंत रामदासी,नरेश जीनवाल, माऊली भोसले, रमेश साठे, पराग डिंगणकर,मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जमाले, ज्येष्ठ पत्रकार विजय न्यायाधीश, विकास रामटेके या उपस्थित सर्व मान्यवर पत्रकारांनी आपल्या मनोगतात नवनिर्वाचित दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणारे ज्यांना व्यक्तिगत कामामुळे अभिनंदन बैठकीस उपस्थित रहाता आले नाही अशा सर्व उर्वरित सदस्य पदाधिकाऱ्यांनी सोशल माध्यमांवर आणि आधुनिक डिजिटल संदेश साधनांचा वापर करून अभिनंदन व शुभेच्छा संदेश पोस्ट करून नवनिर्वाचित पत्रकार संघ अध्यक्ष व परिषद सदस्यांना सदिच्छा व्यक्त केल्या.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?