Home शिरूरमहाराष्ट्र पिंपरी चिंचवड शहरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी पवनाथडी जत्रा प्रभावी व्यासपीठ

पिंपरी चिंचवड शहरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी पवनाथडी जत्रा प्रभावी व्यासपीठ

समाज विकास विभाग आयोजित पवनाथडी जत्रेला महापौर रवि लांडगे यांची भेट

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी, (दि.२८ फेब्रुवारी २०२६) पवनाथडी जत्रा ही महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी एक मोठे व्यासपीठ बनली आहे. महिलांना स्वतःच्या कौशल्यावर आधारित व्यवसाय उभारण्याची संधी येथे मिळत आहे. या जत्रेच्या माध्यमातून महिलांना थेट बाजारपेठ उपलब्ध होत असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. भविष्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी अशा उपक्रमांमधून फायदा होईल, असे मत महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिका समाज विकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पवना थडी जत्रेला महापौर रवि लांडगे यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी जत्रेतील सर्व स्टॉल्सना भेट देऊन विविध वस्तूंची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने आयोजित या जत्रेमध्ये शहरातील विविध महिला बचत गटांनी सहभाग नोंदवला असून त्यांच्या उत्पादनांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. घरगुती पदार्थ, पारंपरिक खाद्यपदार्थ, लोणची, पापड, मिठाया, तसेच हस्तकला व सणासुदीच्या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. या जत्रेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक स्वावलंबनाकडे नेणे, त्यांच्यातील उद्योजकतेला चालना देणे आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. पवना थडी जत्रेमुळे महिलांना आपली उत्पादने नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळत असून आत्मविश्वासातही लक्षणीय वाढ होत आहे.

पवना थडी जत्रा ही केवळ खरेदी-विक्रीपुरती मर्यादित नसून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि समाज विकास विभागाच्या या उपक्रमामुळे शहरातील महिला उद्योजकतेला नवे बळ मिळत असून भविष्यातही अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास यावेळी महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी पवना थडी जत्रेला भेट देऊन महिला उद्योजकांच्या उत्पादनांची खरेदी करावी. नागरिकांच्या पाठबळामुळे महिलांचे मनोबल वाढते आणि त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल, असे आवाहन महापौर लांडगे यांनी नागरिकांनाही केले.

banner

यावेळी महापौर रवि लांडगे यांनी जत्रेतील महिला बचत गटांशी संवाद साधत त्यांच्या कष्टाचे आणि उद्योजकतेचे कौतुक केले. महिलांनी स्वहस्ते तयार केलेल्या खाद्यपदार्थांपासून ते हस्तकला, गृहउपयोगी वस्तू, सजावटीच्या साहित्यापर्यंत विविध उत्पादनांची रेलचेल पाहून महापौर रवि लांडगे यांनी समाधान व्यक्त केले तसेच शहरातील माझ्या भगिनींच्या समस्यांसाठी हा लाडका भाऊ त्यांच्या पाठीशी उभा राहील असेही ते म्हणाले.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?