Home शिरूरमहाराष्ट्र अलंकापुरीत हनुमान जन्मोत्सव दिनी विविध धार्मिक कार्यक्रम

अलंकापुरीत हनुमान जन्मोत्सव दिनी विविध धार्मिक कार्यक्रम

माऊली मंदिरासह पंचक्रोशीत हनुमान जन्मोत्सव साजरा

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

आळंदी प्रतिनिधी (दिनांक २ एप्रिल २०२६)आळंदी येथील माऊली मंदिर, आवेकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्ट, शनि मारुती मंदिर, काळा मारुती , श्री मारुती देवस्थान, हजेरी मारुती मंदिरासह आळंदी पंचक्रोशीतील विविध श्री हनुमान मंदिरात प्रथापरंपरांचे पालन करीत भाविकांचे उपस्थितीत हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमानी साजरा झाला.
आवेकर भावे रामचंद्र संस्थान यांच्या वतीने श्रीराम मंदिरात हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांसह आळंदी धाम सेवा समिती अध्यक्ष, आळंदी शहर शिवसेना प्रमुख राहुल चव्हाण यांचे वतीने महाप्रसाद वाटप सेवा रुजू करण्यात आली. श्रीनां रुद्राभिषेख विश्वस्त अर्जुन मेदनकर यांचे हस्ते झाला. या वेळी गोविंद ठाकूर, लक्ष्मण मेदनकर, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, उदय काळे, बाबासाहेब भंडारे, महेश अयाचित गुरुजी, साहेब महाजन, रामदास दाभाडे, अप्पा महाराज पवार, कृष्णाजी डहाके, हमीद शेख, गौतम पाटोळे, विश्वम्भर पाटील, विलास वाघमारे, डॉ. राजेंद्र जाधव, रोहिदास कदम, नितीन ननावरे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी स्वरअन्वय निर्मित महेश देशपांडे यांची प्रस्तुत सुमधुर भक्ती भावगीतांचा सूरसंगीतमय गायन कार्यक्रम उत्साही वातावरणात झाला. या प्रसंगी नाम घेता मुखी राघवाचे अभंग, संत अभंग आणि श्री पांडुरंग, श्री मारुती, श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे अभंग गायन सेवा रुजू झाली.यात गायक महेश देशपांडे, निवेदन रुपाली देशपांडे, गायिका दुर्वा तेली, तबला मयुर खेडकर, शिवनारायण काशीद यांनी पखवाज साथ दिली. हृदयस्पर्शी भक्तीगीत गायन सेवेस भाविकांनी दाद दिली.या वेळी संस्थान तर्फे गायकांचा सन्मान करण्यात आला. धार्मिक वातावरणात हनुमान जन्मोत्सव आळंदी परिसरात साजरा झाला.आळंदी धाम सेवा समितीचे वतीने महाप्रसाद सेवा रुजू झाली.
माउली मंदिरातील प्रथांचे पालन करीत ह. भ. प. बाळासाहेब महाराज शेवाळे यांचे कीर्तन झाले. आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवा निमित श्रीना रुद्राभिषेक विश्वस्त अर्जुन मेदनकर यांचे हस्ते झाला. यावेळी पूजेचे पौरोहित्य महेश गुरुजी अयाचीत यांनी केले. माउली मंदिरात श्रीनां रुरअभिषेख पूजा करण्यात आल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. गोपाळपुरातील मारुती देवस्थान चे वतीने हरिनाम गजरात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. नारायण महाराज जाधव यांचे सुश्राव्य वाणीतून कीर्तन सेवा रुजू झाली. देवस्थानचे अध्यक्ष अप्पा महाराज मोरे यांचे मार्गदर्शनात सप्ताहाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
येथील विविध मठ,मंदिरे आणि धर्मशाळा तसेच परिसरातील पंचक्रोशीत श्री हनुमान जन्मोत्सवाचे सोहळ्यात श्रीचे जीवन चरित्रावर आधारित नामवंत कीर्तनकार, महाराज मंडळींची कीर्तन सेवा, संगीत गायन सेवा ज्ञानभक्तिमय हरिनाम जयघोषात झाली. यात बाळासाहेब महाराज शेवाळे, सोमनाथ भालेकर महाराज, भाविक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.भाविक नागरिकांनी रांगा लावून श्रींचे दर्शन घेतले.श्री हजेरी मारुती मंदिरात जन्मोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आल्याचे माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांनी सांगितले. हजेरी मारुती मंदिरातील जन्मोत्सवा निमित्त परिसरात लक्षवेधी मंडप,रोषणाई केल्याने मंदिर परिसर भाविक, नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. आळंदी माऊली मंदिर,शनि मारुति मंदिर व हजेरी मारुती, श्री राम मंदिरात पुष्प सजावट लक्षवेधी ठरली.
श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्त ग्रामदैवत श्री हजेरी मारुती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात पहाटे ५ ते सकाळी ७ या वेळेत भालेकर महाराज यांचे कीर्तन हरीनाम गजरात झाले.मारुतीरायाचे दर्शन घेत भाविकांनी श्रींना श्रीफळ अर्पण वाढवीत पूजा केली. या वेळी आळंदीतील विविध मंदिरांत अन्नदान महाप्रसाद वाटप भक्तिमय वातावरणात झाले. रात्री आळंदीकर गावकरी भजनी मंडळाच्या वतीने भजनसेवा रुजू होत आहे. श्री माऊली मंदिरातही हनुमान जन्मोत्सव सोहळा देवस्थानच्या वतीने परंपरेने साजरा झाला. काळा मारुती मंदिर येथे संतोष महाराज मोझे यांचे वतीने कीर्तन सेवा झाली. वाघमारे परिवार भाविक भक्त यांचे तर्फे महाप्रसाद,आरती झाली.शनी मंदिर,मारुती मंदिर येथे सोमनाथ वाघमारे परिवाराचे वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवतेज मित्र मंडळाचे वतीने मारूतिरायांची महाआरती, श्रींची पूजा, दूध महाप्रसाद वाटप उत्साहात करण्यात आले. या साठी शिवतेज मित्र मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. इंद्रायणी नगर येथील मारुती मंदिरात आरती, पूजा, कलशारोहन, महाप्रसाद वाटप झाल्याचे अध्यक्ष गणेश रहाणे यांनी सांगितले.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन. पिंपरी चिंचवड (दिनांक १४ एप्रिल २०२६) डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अफाट सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सक्षमीकरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, सन्मानास पात्र आहे. समानता, न्याय आणि सर्वांप्रति आदर यावर आधारित समाजाचे त्यांचे ध्येय आपण पुढे नेऊया. असे निरूपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले, आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढून शिक्षण, संघटना आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि शोषितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देत राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा. नगरसेवक पंडीत गवळी,ॲड गोरक्ष लोखंडे, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, नगरसेविका वर्षा जगताप, योगिता बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, संभाजी बारणे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, सरचिटणीस नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?