पिंपरी चिंचवड प्रतिनिधी (दिनांक ११ फेब्रुवारी) २०२६
माझी वसुंधरा जनजागृती प्रभाग क्रमांक १२ दुर्गा टेकडी इंदिरा उद्यान निगडी या ठिकाणी बेसिक्स I E C टीम द्वारे माझी वसुंधरा पंचमहाभूते व वृक्षारोपण आणि जनजागृती. अभियानाची जनजागृती करण्यात आली
माझी वसुंधरा” जो निसर्गाच्या “पंचमहाभूते” नावाच्या पाचही घटकांवर लक्ष केंद्रित करतो. त्यात भूमी (जमीन), जल (पाणी), वायू (हवा), अग्नी (ऊर्जा)आकाश (संवर्धन) झाड (पर्यावरण) इ. घटकांचा समावेश होतो.
निसर्गाच्या पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश पंचतत्वासोबत जीवन पद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैव विविधतेचेही अस्तित्त्व राहणार नाही.
माझी वसुंधरा अभियानाचे मुख्य वैशिष्ट्ये: पंचमहाभूतावर आधारित जमीन, पाणी, हवा, ऊर्जा आणि आकाश या पाच घटकांचे जतन व संवर्धन करणे. वातावरण बदलाचे परिणाम कमी करणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देणे.
यात कार्बन सिक्वेस्ट्रेशन (कार्बन शोषून घेणे),हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील (शहरी व ग्रामीण) पर्यावरणाचे संरक्षण यावर भर दिला जातो. या परिसरातील नागरिकांना स्वच्छ व सुंदर व हरित शहर बनूया या उद्देशाने जनजागृती चे आव्हान करण्यात आले.
पर्यावरण रक्षण व निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे प्लास्टिक टाळा निसर्ग वाचवा आणि कापडी पिशव्यांचा वापर करा. असे आव्हान.बेसिक्स संस्थेच्या वतीने माझी वसुंधरा यांच्या माध्यमातून करण्यात आले. त्यावेळी प्रामुख्याने सूर्यनमस्कार ग्रुप व I E C टीमच्या वतीने च्या वतीने स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्याचा संदेश देऊन वृक्षारोपण करण्यात आले अनेक नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
