Home सामाजिक वल्लभ नगर एसटी महामंडळातर्फे देण्यात येणारे एनसीएमसी कार्डाची नियमाप्रमाणे वसुली करा नितीन यादव

वल्लभ नगर एसटी महामंडळातर्फे देण्यात येणारे एनसीएमसी कार्डाची नियमाप्रमाणे वसुली करा नितीन यादव

नागरिकांच्या तक्रारीने जागृत नागरिक महासंघाने एस टी महामंडळात दिली भेट

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी गुरुवार (दिनांक २६ फेब्रुवारी २०२६) रोजी जागृत नागरिक महासंघ माहिती अधिकार संघाकडे काही नागरिकांच्या एन सी एम सी कार्ड काढण्यासाठी ज्यादा शुल्कची मागणी केली जात आहे. अशा तक्रारी आल्या होत्या त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी वल्लभनगर एसटी स्टँड च्या विभाग नियंत्रक श्रीमती पल्लवी पाटील यांची जागृत नागरिक महासंघाने भेट घेतली भेटी दरम्यान एन सी एम सी कार्ड च्या अतिरिक्त शुल्क आपल्या वल्लभनगर एसटी आगारातील कर्मचारी. नवनाथ नेचरुड हे नियमाप्रमाणे १९९ रुपये आकारणी करणे अपेक्षित होते परंतु ते २५० रुपये एवढी रक्कम ज्येष्ठ नागरिकडुन घेत असल्याच्या तक्रारी संघाकडे आल्या होत्या त्या संदर्भात श्रीमती पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली त्यावेळी तेथील कार्यरत असलेले कर्मचारी नवनाथ निचरुड यांना श्रीमती पाटील यांनी बोलून घेतले व तक्रारी विषयी विचारणा केली असता त्याने काही लोकांकडून १९९ ऐवजी २५० रुपये घेतल्याचे कबूल केले. तेव्हा श्रीमती पाटील यांनी याबाबत तुमच्यावर मी गुन्हा दाखल करेल या भाषेत त्यांना सुनावले तेव्हा नवनाथ यांनी झालेली चूक मान्य केली.व या पुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही असे म्हणत क्षमा मागितली. तेव्हा जागृत नागरिक महासंघाने नवनाथ यांना सहानुभूती दाखवली व यापुढे अशी तक्रार येऊ नये अशी समज दिली तथापि अशा पद्धतीने शासन सेवेत कुठेही अतिरिक्त वसुली होत,असेल तर नागरिकांनी जागृत राहून त्याचा योग्य पाठपुरावा करावा असे महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव यांनी आपले मत स्पष्ट केले. या वेळी प्रामुख्याने उपस्थित महासंघातर्फे अध्यक्ष नितीन यादव पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे, व सदस्य गणेश हातमकर, तसेच एसटी महामंडळातर्फे वल्लभ नगर एसटी विभाग नियंत्रण श्रीमती पल्लवी पाटील, व स्थानक प्रमुख श्रीमती वैशाली कांबळे, उपस्थित होते. यावेळी श्रीमती पाटील, यांनी ही गंभीर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल महासंघाचे आभार मानले शिवाय अशा निस्वार्थी संस्थांचा आम्हाला निश्चितपणे अभिमान वाटतो असे सांगितले

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?