पिंपरी प्रतिनिधी निगडी येथील अन्नधान्य पुरवठा शासन मान्यता प्राप्त विभाग अ व ज विभागाच्य स्वस्त धान्य दुकानातून रेशन कार्ड धारकांना शासन नियमानुसार प्रत्येक कार्ड ग्राहकाला त्याच्या कुटुंबातील सदस्य संख्येनुसार प्रत्येक व्यक्तीस ५ किलो असे धान्य शासनाच्या नियमाप्रमाणे मिळत असून दुकानदार रेशन कार्ड धारकांना पावती न देता प्रत्येक वेळी धान्याची कपात करून कमी धान्य नागरिकांना मिळत आहे अशा अनेक तक्रारी छावा मराठा युवा महासंघाकडे आल्या आहेत छावा संघटनेच्या वतीने अधिकाऱ्यांना १६ सप्टेंबर २०२५ रोजी लेखी निवेदनाद्वारे कळवण्यात आले होते.या संदर्भात अनेक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा या वर संबंधित अधिकाऱ्यांनी ठोस निर्णय घेतल्याचे दिसून येत नाही गरीब जनतेची लूट चालू आहे.गरिबांच्या तोंडचा घास काढून हे धान्य काळया बाजारात विकले जात आहे त्यामुळे संघटनेने आता आक्रमक भूमिका घेणार आहे प्रत्येक दुकानावर जाऊन गैरप्रकार प्रकार रोखण्याचे ठरवले आहे.
इ पॉस मशीन द्वारे बायोमेट्रिक पद्धतीने थंब घेऊन धान्य दिले जाते परंतु काही मोजके स्वस्त धान्याचे दुकानदार काही मोजक्याच कार्ड धारकांना थंब घेऊन ई पॉस प्रणालीद्वारा निघणारी पावती देतात बाकी सर्रास दुकानदार पावती देत नाहीत. त्यामुळे कार्ड धारकाला किती धान्य मिळते याचा तपास लागत नाही कार्डधारकाने दुकानदारांना पावती विषयी विचारणा केली की दुकानदार सरळ भाषेत कधीच बोलत नाही अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी लेखी स्वरुपात आमच्याकडे आलेल्या आहेत ग्राहकाने बायोमेट्रिक थंब दिल्यानंतर इ पॉस पावतीची मागणी करून सुद्धा त्याला त्याची पावती घेण्यास दुकानदार नकार देतो व रेशन बंद करण्याची उद्धटपणे धमकी दिली जाते त्यामुळे हे गरीब नागरिक अधिकाऱ्याकडे तक्रार करीत नाहीत काही दुकानदा पावती न देण्याचा आदेश अधिकाऱ्यांकडूनच आहे असे सांगितले जाते भ्रष्टाचाराबाबत जनतेच्या तक्रारी व रोष वाढत आहे नियमापेक्षा धान्य कमी देणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्यात यावी जर ही कारवाई अधिकाऱ्याकडनं होत नसेल तर याला आपली मुखसंमती आहे असे धनाजी येळकर पाटील म्हणाले. कि सामान्य जनतेची लूट चालू आहे.या सर्व प्रकाराची छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यता पडताळून पहिलेली आहे. त्याचे पुरावे सुद्धा मुख्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.त्यामुळे छावा संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक दुकानावर जाऊन रेशन कार्ड धारकांशी संवाद साधून मेरा रेशन मेरा अधिकार हे रेशनकार्ड धारकांसाठी जनजागृती अभियान सोमवार दिनांक ८ डिसेंबर २०२५ पासून सर्व रेशन दुकानावर राबवण्यात येणार आहे.ज्यामुळे गरीब आणि गरजू कुटुंब आपल्या हक्काच्या धान्यापासून वंचित राहणार नाहीत,त्यांच्या अधिकाराची आणि हक्काची माहिती आमच्या अभियानाच्या माध्यमातून करून दिली जाणार आहे. तसेच जे रेशन दुकानदारावर शासनाच्या नियमानुसार वागणार नाहीत.अशा दुकानदारावर त्यांचे परवाने रद्द करून कायदेशीर कठोर कारवाई करावी अन्यथा छावा संघटनेच्या वतीने मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल असे संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील निलंगेकर म्हणाले.
अ झोन चे पुरवठा अधिकारी विजयकुमार क्षीरसागर तर ज झोन चे प्रदिप डंगारे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी छावा प्रमुख धनाजी येळकर पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष राजेश गुंड, प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील निलंगेकर, पुणे पूर्व चे जिल्हाध्यक्ष महेंद्र शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.
