Home शिरूरमहाराष्ट्र वन विभागाचे सूत्र हलेना मरणाची भीती जाईना

वन विभागाचे सूत्र हलेना मरणाची भीती जाईना

अजून किती दिवस भीतीच्या वातावरणामध्ये जगायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

चाकण दिनांक ९ डिसेंबर-२०२५) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पठारवाडी येथील शेतकरी आल्हाट यांच्या शेतात सोपान करगळ या गरीब धनगर समाजातील व्यक्तीचा वाडा बसला होता.यावेळी रात्री अचानक बिबट्याने हल्ला केला व एका बकराच्या मानेला धरून जात आस्ताना कुत्र्यांनी धाव घेतली व भूकल्यानंतर सोपान करगळ व कुटुंबीयांनी बॅटरीच्या प्रकाशात महाकाय बिबट्याला बकऱ्याचे पिल्लू घेऊन जाताना पाहिले. आरडा ओरडा केल्यानंतर बकराचे पिल्लू उंच वाघोरीत अडकल्यामुळे बिबट्या बकऱ्याला त्याच ठिकाणी सोडून वाघाने पळ काढला.

मागील काळात येथील स्थानिक शेतकरी यांना याच परिसरात वारंवार वेगवेगळे बिबटे निदर्शनात आले असून अजुन ही बिबट्याचे ठसे शेतामध्ये ओलावा असलेल्याने दिसून येत आहेत. काही दिवसापूर्वी निमगाव दावडी परिसरात लहान मुलाच्या मानेला धरून बिबट्या ओढत चालण्याच्या घटना घडली होती पाळीव प्राण्यांवर, मानसांवर बिबट्या करीत असलेले हल्ले हे पुढील काळासाठी भयंकर घटनेचे स्वरूप घेते की काय असं प्रश्न निर्माण झाला आहे.

सदर घटना घडलेल्या परिसरात शेती तसेच मानवी वस्ती असून या ठिकाणी शेतात काम करणाऱ्या महिला पुरुष तसेच लहान मुले यांचा कायम या ठिकाणी वावर असतो. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिक शेतकरी यांनी या ठिकाणी वन विभागाने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा बसवावा अशी मागणी केली आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?