पिंपरी चिंचवड प्रतिनिधी (दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ ) लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रुपीनगर महीला बचतगट व कुटुंब फाउंडेशनच्या वतीने शिबिरांचे आयोजन गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात करण्यात येणार आहे महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत तपासणी मेळावा सादर करण्यात येत आहे. महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची तपासणी आहे गर्भाशयाच्या आरोग्य संबंधी अशा अनेक विविध जनरल फिजिशियन बाबींची जनरल- Blood, BP, HB, ECG तपासणी होणार आहे तसेच वाढत्या वयाबरोबर कॅन्सर चे प्रमाण वाढत आहे, रुपीनगर महीला बचत गट आणि कुटुंब फाऊंडेशन पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुपीनगर प्रबोधनकार ठाकरे विद्यालयामध्ये सकाळी.बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आव्हान शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख पिंपरी चिंचवड शहर आणि कुटुंब फाऊंडेशन पुणे जिल्हा अध्यक्ष मणेश भालेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे
रुपीनगर महिला बचत गट कुटुंब फाऊंडेशनच्या वतीने शिबिराचे आयोजन
67