Home आरोग्य सोशल मीडिया प्रभावाने अलंकापुरीतील बाह्यवळण मार्ग अखेर स्वच्छ

सोशल मीडिया प्रभावाने अलंकापुरीतील बाह्यवळण मार्ग अखेर स्वच्छ

बाह्यवळण मार्गावरील कचरा हटवला ; आळंदी नगरपरिषद प्रशासनाचे कौतुक

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

आळंदी प्रतिनिधी आळंदी (दिनांक २७ एप्रिल २०२६) रोजी तीर्थक्षेत्र आळंदी येथील बाह्यवळण मार्गावरील कचऱ्याचे साम्राज्य दूर करण्यासाठी सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी अस्वच्छते बाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता. व्हिडिओ सोशल मीडियावर आल्याने प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन आळंदी बाह्यवळण मार्गाचे दुतर्फा स्वच्छतेचे काम जेसीबीचे सहाय्याने सुरू केले. त्यावेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी आरोग्य विभागास तत्काळ सूचनादेश देत स्वच्छतेचे काम करून परिसरातील कचरा जेसीबी चे सहाय्याने संकलन करीत ट्रॅक्टर, ट्रक मधून पुढील विल्हेवाटीसाठी आरोग्य विभाग कडे सुपूर्त केला. आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी नागरिक, भाविकांना कचरा घंटा गाडीत सुपूर्द करण्याचे आवाहन केले.

सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन प्रशासनाने केले. आळंदी लगतचे ग्रामपंचायत केळगाव आणि चऱ्होली खुर्द भागातील रहिवासी आळंदीतील बाह्यवळण मार्गावर या जा करताना कचरा फेकून निघून जात असल्याने नगरपरिषद ही या प्रकरणी संबंधित प्रशासनास सांगून कंटाळली. मात्र गेल्या महिना भरचा कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने दुर्गंधीचे घाणीचे साम्राज्य पसरल्याने भाविक, नागरिक यांनी नाराजी व्यक्त केली होती. या मुळे प्रशासनाने ही तत्काळ दखल घेत स्वच्छता करीत एक पाऊल पुढे टाकले. चऱ्होली खुर्द, केळगाव, आळंदी येथे प्रभावी जनजागृती करण्याची मोहीम आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली. अनेक नागरिकांसह आळंदी जनहित फाउंडेशन तर्फे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दखल घेऊन स्वच्छतेचा उपक्रम तत्काळ हाती घेत परिसर स्वच्छ केल्याने नागरिकांनीही प्रशासनाचे कौतुक केले.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?