पीसीएमसी आयडीए यांच्या मार्गदर्शनाखाली सरस्वती विद्यालयात ‘कम्युनिटी डेंटल हायजिन’अंतर्गत शिबिराचे आयोजन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी सोमवार (दिनांक २४ डिसेंबर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील इंडियन डेंटल असोसिएशन पिंपरी-चिंचवड शाखा (IDA PCMC) व श IDA MSB CDH (Community Dental Hygiene) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ मुख अभियान’अंतर्गत विद्यार्थ्यांच्या दंतआरोग्यासाठी मोफत दंत तपासणी व मुखस्वच्छता जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले, सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यय एल आय जी कॉलनी सिंधू नगर निगडी या भागात अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी इयत्ता ८ वी व ९ वी मधील एकूण ४५० विद्यार्थ्यांची सखोल दंत तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या दातांची स्थिती,हिरड्यांचे आरोग्य तसेच तोंडाच्या स्वच्छतेबाबत तज्ञ दंतवैद्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन आयडीए पिंपरी-चिंचवडचे मानद अध्यक्ष डॉ. विनय कुमार शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले,
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अनुभवी दंतवैद्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता, प्रामुख्याने डॉ. विनय कुमार शेट्टी, (ida president pcmc) डॉक्टर दिपाली पेटकर, डॉक्टर तनुजा विलास जगताप, डॉक्टर दीपिका जैन मांडोत, डॉक्टर सौरभ तनपुरे,
डॉ. प्रणोती तनपुरे,डॉक्टर गौरव विसपुते,आहे डॉक्टर मंजुषा दलवी,
डॉ. सचिन फुंडे, डॉक्टर मधुसूदन डीडके तिडके, डॉक्टर ऋषिकेश जोशी, तसेच इंटर्न सुमती बिर्ला यांनीही या शिबिरात सहभाग घेतला होता,
या वेळी विद्यार्थ्यांना योग्य ब्रशिंग पद्धत, दंतआरोग्याचे महत्त्व, तोंडाची स्वच्छता राखण्याच्या सवयी याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना टूथब्रश, टूथपेस्ट व आवश्यक दंत-किटचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये दंत आरोग्याविषयी जागरूकता वाढून लहान वयातच आरोग्यदायी सवयी रुजण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व व्यवस्थापनाने या सामाजिक उपक्रमाला मोलाचे सहकार्य केले.
विद्यार्थ्यांचे दंतआरोग्य सुदृढ ठेवणे व समाजात मुखस्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयडीए पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने सांगण्यात आले.
