Home शिरूरमहाराष्ट्र शंकरराव मासुळकर नागरी आरोग्य केंद्र व नेत्र रुग्णालय हे केवळ नेत्र रुग्णालय नसून पिंपरी चिंचवड शहराचे खऱ्या अर्थाने नेत्र आहेत

शंकरराव मासुळकर नागरी आरोग्य केंद्र व नेत्र रुग्णालय हे केवळ नेत्र रुग्णालय नसून पिंपरी चिंचवड शहराचे खऱ्या अर्थाने नेत्र आहेत

जागृत नागरिक महासंघाची पिंपरी चिंचवड मनपाच्या शंकरराव मासुळकर नागरी आरोग्य केंद्र व नेत्र रुग्णालयाला भेट 

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

बुधवार दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी जागृत नागरिक महासंघाच संघाच्या शिष्टमंडळाने पिं चिं मनपाच्या अजमेरा येथील शंकरराव मासुळकर नेत्र रुग्णालयाला अचानक भेट दिली भेटीमध्ये अनेक आश्चर्यकारक व धक्कादायक गोष्टीचा प्रत्यक्षात अनुभव आला रुग्णालयातील स्वच्छता टापटीपपणा संपूर्ण रुग्णालयातील सर्व स्वच्छतागृह इतके स्वच्छ होते कि अशी स्वच्छता जागृत नागरिक महासंघानला आजपर्यंत कुठल्याही (खाजगी वा सरकारी) रुग्णालयामध्ये पाहायला मिळाली नाहीत वेस्टर्न आणि इंडियन असे दोन्ही प्रकारचे टॉयलेट या रुग्णालयामध्ये आहेत एक साधा कागदाचा कपचा (तुकडा) देखील कुठे पडलेला आम्हाला दिसून आला नाही या हॉस्पिटलची माहिती घेत असताना तेथील डॉक्टर रूपाली महेशगौरी म्हणाल्या की रोज कमीत कमी २५० पेक्षा जास्त रुग्णांची नेत्र तपासणी आणि २५ पेक्षा जास्त रुग्णांच्या नेत्रावर विविध ऑपरेशन साठी तयारी करावी लागते रुग्णांना एक दिवस अगोदर रुग्णालयात थांबून ठेवले जाते व ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा एक दिवस रुग्णांना थांबून दुसऱ्या दिवशी त्यांना पाठवले जाते या सर्व बाबींची काळजीपूर्वक दखल घेतली जाते अनेक गोष्टी सामना करत असताना खरोखर आश्चर्यकारक आहेत २५० पेक्षा जास्त नेत्र तपासणी आणि २५ पेक्षा जास्त नेत्रऑपरेशन करणारे पिंपरी चिंचवड शहरातील एकमेव रुग्णालय असावे असे जागृत नागरिक महासंघाला वाटते विशेष महत्त्वाचे म्हणजे ही सेवा पूर्णपणे मोफत आहे चष्मासाठी फक्त ३० रुपये तीस आणि केस पेपर साठी रुपये वीस रुपये असे ५० रुपये मध्ये सर्व नेत्र रुग्णसेवा उपलब्ध आहेत डोळ्यांचे ऑपरेशन झालेले आणि ऑपरेशन होणार आहे अशा रुग्णांची आम्ही प्रत्यक्ष भेट घेतली असता सर्वांनी सदर हॉस्पिटल च्या रुग्णसेवेबाबत अतिशय समाधानकारक आणि आनंद व्यक्त केला विशेष म्हणजे अतिशय मर्यादित डॉक्टर्स नर्स व बीव्हीजी चे कर्मचारी यांच्या मदतीने ही सेवा दिली जाते यामध्ये रुग्णालयातील मुख्य अधिकारी डॉक्टर रूपाली महेशगौरी तसेच इतर सर्व बीव्हीजी चे कर्मचारी आणि मनपाचे कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नातून आणि अविरत सेवेतून पिंपरी चिंचवड शहराला उत्कृष्ट दृष्टी देण्याचे काम सदरचे नेत्र रुग्णालय करत आहे हे हॉस्पिटल म्हणजे खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवडचे नेत्र आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफणे आणि डॉक्टर दादेवार यांचे महासंघातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त केले पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांनी सदर रुग्णालयाला आवश्यक असणाऱ्या इतर यंत्रसामग्री व इतर बाबी व मनुष्यबळ अजून जास्त प्रमाणात पुरवले तर ही सेवा अजूनही उत्कृष्ट होईल अशी महासंघाला खात्री वाटते आणि डॉक्टर लक्ष्मण गोफणे व अभय चंद्र दादेवार महासंघाच्या सूचनेल डॉक्टर लक्ष्मण गोफणे डॉक्टर दादेवार हे हॉस्पिटलच्या मागणी नक्कीच अतिशय सकारात्मक घेतील व येणाऱ्या पेशंटला सुलभ सुविधा कमीत कमी वेळेमध्ये घेता येतील

जागृत नागरिक महासंघाचे एकंदरीत सामाजिक कामाबद्दल बोलताना डॉ रुपाली महेशगौरी यांनी जागृत नागरिक महासंघाला आईची उपमा दिली आई जशी आपल्या लेकरांना समजावून शिकवून चुकीचा असेल तर दटाऊन व शिक्षा करून एक उत्कृष्ट सक्षम नागरिक बनवण्याचं कार्य करत असते तसंच एका उत्कृष्ट शासन सेवेसाठी आणि नागरिक सेवेसाठी जागृत नागरिक महासंघ काम करत आहे असे गौरवोद्गार काढले कोणत्याही शासकीय कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख जर खंबीर पारदर्शक आणि आपण केवळ सेवक आहोत नागरिक हे मालक आहेत असा दृष्टिकोन ठेवून सेवा देत असेल तर ते कार्यालय संपूर्ण शहरांमध्ये कौतुकास पात्र ठरते डॉक्टर रूपाली महेश गौरी या याच भूमिकेतून ही रुग्णसेवा करत आहेत अगदी तशीच भावना जागृत नागरिक महासंघाची शंकरराव मासुळकर नागरी आरोग्य केंद्र व नेत्र रुग्णालयाबद्दल झाली आहे

 

banner

रुग्णालयामध्ये माहिती अधिकार कायदा कलम ४ ची पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही तरीही डॉ रूपाली महेशगौरी यांनी माहिती अधिकार कलम ४ ची संपूर्ण कार्यवाही कमीत कमी कालावधीमध्ये पूर्ण केली जाईल अशी महासंघाला खात्री दिली पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या नेत्र रुग्णसेवे बद्दल जागृत नागरिक महासंघाने डॉक्टर रूपाली महेशगौरी डॉक्टर लक्ष्मण गोफणे सरआणि डॉक्टर दादेवार सर यांचे मनःपूर्वक आभार मानले त्यावेळी जागरूक नागरिक महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव उपाध्यक्ष राजेश विश्वकर्मा पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे सचिव राजू डोगीवाल उपस्थित होते

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?