Home शिरूरमहाराष्ट्र पवना धरण येथे ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे यांच्या हस्ते जलपूजन!

पवना धरण येथे ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे यांच्या हस्ते जलपूजन!

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड  दि १३ सप्टेंबर २०२५ :– अखिल मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे आणि शहरातील पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये पवना धरण १०० टक्के भरल्यामुळे आज शनिवार ( दिनांक १३ सप्टेंबर ) रोजी जलपूजन करण्यात आले.

 

ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ, सुनिल ऊर्फ बाबू कांबळे, प्रविण शिर्के, विनय लोंढे,संतलाल यादव, सुरज साळवे, देवा भालके, जितेंद्र गवळी, दिलीप देहाडे,संतोष जराड,गणेश शिंदे आदी पत्रकार उपस्थित होते.

 

banner

यावेळी ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे म्हणाले की,” गेली तीन वर्ष झाले पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांच्या वतीने पवनाधरण १०० टक्के भरल्यानंतर जलपूजन करण्यात येते.

मागील तीन वर्षांपासून महापालिकेचा कारभार अधिकारी वर्ग चालवतात, लोकप्रतिनिधी नसल्याने परंपरा खंडित होऊ नये याउद्देशाने पत्रकारांनी गेली चार वर्षांपासून जलपूजन करण्याची परंपरा चालविली जात आहे.

मागील पंधरा दिवसापूर्वी पवना धरण पूर्ण भरले मात्र गणेश उत्सवाच्या व्यस्त कामामुळे जलपूजन करण्यास उशीर झाला आणि आज (दि.१३ सप्टेंबर ) रोजी जलपूजन करण्यात आले. पवनामाई वर्षभर पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवण्याचे अतिमहत्वाचे काम करते त्याचीच उताराई म्हणून आणि पवनामाईचे आदरातिथ्य राखले जावे या उद्देशाने जल पूजनाचे आयोजन करण्यात येते. पवना धरणातील जलाचे पूजन पुष्पहार,श्रीफळ वाहून करण्यात येत असल्याचे ही श्री गोरे यांनी सांगितले.

पवनामाई जलपूजनानंतर पत्रकारांनी जलविहाराचा आनंद घेतला

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?