Home शिरूरमहाराष्ट्र स्मार्ट सिटी, पण हॉस्पिटल अजूनही ‘कॅश सिटी’मध्ये अडकले!

स्मार्ट सिटी, पण हॉस्पिटल अजूनही ‘कॅश सिटी’मध्ये अडकले!

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी दिनांक (११ सप्टेंबर २०२५) पिंपरी चिंचवड शहर देशातील स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवडले गेले असून, येथे डिजिटल सुविधा, आधुनिक पायाभूत सुविधा, मेट्रो आणि ऑनलाईन सेवांचा गाजावाजा मोठ्या प्रमाणात केला जातो. पण प्रत्यक्षात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित मूलभूत सेवेत मात्र पालिकेचे आकुर्डी हॉस्पिटल अजूनही मागे असल्याचे वास्तव समोर आले आहे.

 

आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कुटे हॉस्पिटलमध्ये केस पेपर काढण्याचे सुविधा अजूनही कॅशलेस मध्ये दिसून येईल काही नागरिक आरोग्य विषयी हेच पेपर काढण्यासाठी गेले असता काचेवर लावलेले फलक वाचून नागरिक अचंबित झाले. त्या फलकावर स्पष्टपणे लिहिले होते – “२० रुपये सुट्टे द्या. फक्त रोख पैसे स्वीकारले जातील.”

 

banner

आज संपूर्ण देशात डिजिटल व्यवहार सर्वत्र सुरू झाले आहेत. चहा विक्रेते, भाजीवाले, किराणा दुकानदारदेखील आता मोबाईलद्वारे पेमेंट स्वीकारतात. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्वतः पंतप्रधानदेखील वारंवार “डिजिटल इंडिया”चा जनजागृतीचा नारा देत आहेत. तरीसुद्धा नागरिकांची सोय पाहायला हवी असलेल्या पालिकेच्या आकुर्डी रुग्णालयात मात्र अजूनही फक्त रोख पैसे या जुन्या पद्धतीवर भर दिला जातोय, हे धक्कादायक आहे.

 

रुग्णालयात अचानक येणाऱ्या लोकांकडे रोख रक्कम किंवा सुट्टे पैसे असतीलच असे नाही. अशा वेळी नागरिकांची गैरसोय होते, वेळ वाया जातो आणि रुग्णसेवेतील कार्यक्षमता कमी होते.

 

नागरिक प्रतिक्रिया :

“मोबाईलमधून UPI सर्वत्र चालतो, मग पालिकेच्या हॉस्पिटलमध्येच का नाही?” – राजेश जाधव

“२० रुपये सुट्टे नसेल तर केस पेपर नाही… हे रुग्णांच्या भावनांशी खेळणे आहे.” – मनिषा जाधव

“डिजिटल सुविधा सुरू केल्या तर पारदर्शकता येईल, भ्रष्टाचार कमी होईल. मग हॉस्पिटलमध्येच उशीर का?” – सामाजिक कार्यकर्ते मंदार चाफेकर

“स्मार्ट सिटीसाठी करोडो रुपये खर्च होतात, पण नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी एवढी छोटी सुविधा मिळू शकत नाही का?” – ज्येष्ठ नागरिक

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?