पिंपरी २७ ऑगस्ट रुपीनगर तळवडे परिसरात रक्तदान व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून युवकांनो रक्तदान करा असा संदेश देत अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले. त्याचबरोबर.आरोग्य विषयावरती एक अवयव दान एक नवीन कल्पना त्यांनी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर राबवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘अवयव दान श्रेष्ठ दान’ या संकल्पनेला सुरुवात करण्याचा संकल्प शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख,पिंपरी चिंचवड तसेच कुटुंब फाऊंडेशन पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष मणेश पंडीत भालेकर यांनी केला आहे.
गणेश जयंतीच्या मुहूर्तावर गणपती विसर्जन या कालावधी पर्यंत या उपक्रमाची जनजागृती करण्यात येणार आहे या परिसरातील सर्व मंडळाचे सभासद व मित्र परिवार यांना सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदान हे जसे श्रेष्ठ दान मानले जाते, तसेच मृत्यूनंतर अवयव दानाद्वारे एखाद्याला नवे जीवन मिळू शकते, हे समाजाला पटवून देणे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे रुपीनगर-तळवडे परिसराची एक वेगळी ओळख निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
डॉ. स्वाती देशमुख (हृदयरोगतज्ज्ञ)
“अवयव दानामुळे असंख्य रुग्णांना जीवनदान मिळू शकते. या उपक्रमातून लोकांमध्ये जागृती होणे ही काळाची गरज आहे. हे काम सामाजिकदृष्ट्या फार मोठं आहे.”
या परिसरातील युवकांनी घेतलेला हा पुढाकार संपूर्ण समाजासाठी आदर्श आहे. ‘रक्तदान ते अवयव दान’ हा टप्पा खरं तर मानवतेचा खरा प्रवास आहे.”
शिक्षिका वैशाली पाटील –
“अशा संकल्पनांमुळे विद्यार्थ्यांमध्येही समाजासाठी काहीतरी करण्याची भावना निर्माण होते. भविष्यातली पिढी अधिक संवेदनशील व जबाबदार नागरिक म्हणून घडेल.”
