पिंपरी, दि. २५ ऑगस्ट अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वर्धापनदिन सोहळ्यात आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमास अखिल भारतीय नाट्य परिषद मध्यवर्ती संघटनेचे विश्वस्त अशोक हांडे, नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर व नाट्य व चित्रपट सृष्टीचे कलाकार, लेखक, संगीतकार, दिग्दर्शक, कवयित्री आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध कलाकारांना पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. तसेच, शहरातील आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे यांनी विशेष सन्मान करण्यात आला. मराठी चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदानाबद्ल आणि आजपर्यंत तब्बल साठ मराठी चित्रपटाचे प्रिमीअर शो आयोजित केला. तसेच, प्रसिद्ध कलाकार माधुरी दीक्षित, आमिर खान आदी कलाकारांचे शहरात कार्यक्रम घेतले. हजारो महिलांचे संघटन करून त्यांना व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे. त्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ तसेच, उद्योगास चालना दिली आहे. या कार्याबद्दल तरडे यांचा सन्मान करण्यात आला.