Home पिंपरी चिंचवड कु. श्रावणी टोणगे पिंपरी चिंचवडचा अभिमान

कु. श्रावणी टोणगे पिंपरी चिंचवडचा अभिमान

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी-चिंचवड शहरातील कासारवाडी गावची कन्या, शिक्षकप पालकांची मुलगी श्रावणी दीपक टोणगे हिला जर्मनीतील प्रतिष्ठित महाविद्यालयाकडून तब्बल एक कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. आणि हे यश तिने तिच्या अथक मेहनतीने मिळवले आहे.

ज्या छत्रपती शाहू महाराज शाळेत श्रावणीने शिक्षण घेतले, त्या शाळेच्या उभारणीसाठी अभिनेत्री रेखा जींनी तब्बल दोन कोटी पन्नास लाख रुपयांचे योगदान दिले होते व शाळेच्या व्यवस्थापनासाठी नगरसेवक श्याम लांडे यांनी पुढाकार घेतला होता. आज याच शाळेतील विद्यार्थिनीने परदेशात असा मान मिळवणे हे संपूर्ण पिंपरी-चिंचवडकरांसाठी व शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.

श्रावणीच्या यशामागे तिच्या आई-वडिलांचा संघर्ष आणि त्याग मोठा आहे. चाळीत राहून साध्या परिस्थितीत मुलांना घडवताना त्यांनी कधीच शिक्षणाची तडजोड होऊ दिली नाही. त्यांच्या आधारामुळेच श्रावणीच्या स्वप्नांना पंख फुटले. तिची शिष्यवृत्ती ही केवळ तिच्या मेहनतीची नव्हे तर तिच्या पालकांच्या घामाची खरी पावती आहे.

श्रावणीचा हा प्रवास हे दाखवतो की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मेहनत, चिकाटी आणि पालकांचा आशीर्वाद असला तर यश नक्कीच गवसते.

banner

या अभिमानास्पद यशाची दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांनी स्वतः श्रावणीच्या घरी जाऊन तिचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?